पुरंदर तालुक्यातील मांढर परिसरामधील वनव्यामुळे चारा जळून खाक तर लोकप्रतिनिधी व दानशूर यांच्या पुढाकाराने पशुपालकांना मोफत चारा वाटप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मांढर तालुका पुरंदर येथील परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी डोंगर भागामध्ये जो वनवा लागला होता त्याच्यामध्ये पशुपालकांच्या गवताच्या गंजी चारा यांचे जळून प्रचंड असे चारा पिकांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवनमान पशुपालनावर अवलंबून असून, पुढील 4 ते 5 महिन्याचा चारा पूर्णपणे जळून गेल्यामुळे, पशुपालकांना जनावरांसाठी पूर्णपणे चारा संपलेला होता, तहसील कार्यालयाला सूचना करून पंचनामा करून घेण्यास सांगितले होते, पंचनामा सुद्धा झाला परंतु शासकीय मदत मिळण्यासाठी वेळ लागणार दिसत असल्यामुळे, मांढर गावातील ग्रामस्थ दत्ताजी पापळ व एम. के. अण्णा पापळ यांच्या मागणीनुसार पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय चंदूकाका जगताप त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे हरिभाऊ लोळे आणि पंचायत समिती सदस्य सायली डॉ मनोज शिंदे यांच्या सहकार्याने व पाठपुराव्याने दानशूर व्यक्तिमत्व आनंदी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जेजुरी चे सर्वेसर्वा डॉ. सुमित काकडे व बाळासाहेब लोळे त्याचबरोबर पानवडी गावचे माऊली बापू भिसे यांच्या सहकार्याने व हरिभाऊ लोळे व डॉक्टर शिंदे यांच्या प्रयत्नातून ऊस आणि वाड्याच्या गाड्या मागवून त्या या शेतकऱ्यांच्या नुकसान झाले आहे, त्यामध्ये नानासो शेळके यांच्या सात गंजी जळाल्या त्याचबरोबर राजेंद्र शिर्के ,विलास लक्ष्मण शिर्के, शिवाजी शिर्के , बापू खोमणे, दत्तू खोमणे, कमल खोमणे, धनाजी शेळके, बापू शेळके या सर्वांना मोफत चारा वाटप करण्यात आला, त्यावेळी मा सरपंच विश्वास तात्या शिर्के, दत्तात्रय आप्पासाहेब पापळ, दादा खोमणे, गोपाळ उत्तरकर ,सागर शिर्के, धनाजी शिर्के, उद्धव शिर्के, स्नेहल सोनू काशीद ,माजी सरपंच वंदना शिर्के, सदाशिव शिर्के, नामदेव शिर्के आणि दिपक पापल हे ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. विश्वास तात्या शिर्के यांनी अत्यंत तातडीने दिलेल्या चाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल आणि यासाठी केलेल्या कार्याबद्दल संजयजी जगताप हरिभाऊ लोळे आणि सायली शिंदे यांचे आभार मानले येणाऱ्या काळात अशीच भरीव मदत शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालनासाठी करण्यात येईल, तसेच येणाऱ्या काळात काळदरी खोऱ्यातील पशुपालकांना मदत करण्यात यावी अशीही जाहीर आव्हान केले. आपली मदत 100% तळातील गरजवंत सर्वसामान्य पशुपालकांना देण्यात येईल असेही डॉक्टर मनोज शिंदे यांनी सांगितले व सहकार्य करणाऱ्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments