Hot Posts

6/recent/ticker-posts

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 'बलिदान मास' निमित्त 'सहाव्या' भव्य 'रक्तदान महायज्ञा'चे आयोजन. सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाचा स्मृतिप्रीत्यर्थ, 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुरंदर' च्या वतीने गेल्या ५ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला 'रक्तदान महायज्ञ' यावर्षी आपल्या सहाव्या (६ व्या) वर्षात पदार्पण करत आहे. शंभूराजांनी स्वराज्यासाठी रक्ताचे बलिदान दिले, त्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून समाजातील गरजूंचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही या भव्य उपक्रमाचे आयोजन केले आहे.हा सहावा भव्य रक्तदान महायज्ञ येत्या रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सासवड येथील ऐतिहासिक कऱ्हामाई मंदिर येथे आयोजित केला आहे. सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:०० या वेळेत हे शिबिर संपन्न होईल.या उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:सातत्यपूर्ण सेवा: सलग सहाव्या वर्षी हा उपक्रम राबवून पुरंदरमधील शिवभक्तांनी रक्ताच्या नात्याची ही परंपरा जपली आहे.प्रेरणादायी बोधवाक्य: 'विसरू कसे बलिदान, चला करू रक्तदान' या भावनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.रक्तदात्यांचा गौरव: सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने 'श्री शंभू महाराज प्रतिमा' आणि पुरंदरचे धुरंदर शिवाजीराव एक्के लिखित 'किल्ले पुरंदर' हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या पवित्र कार्यात सासवड शहर आणि पुरंदर तालुक्यातील जास्तीत जास्त तरुण आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शंभूराजांना रक्ताची मानवंदना द्यावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुरंदर यांच्या वतीने करण्यात आले आहे.या विधायक सामाजिक उपक्रमाला आपले सहकायॅ मिळावे.स्थळ: कन्हामाई मंदिर, सासवड.वेळ: सकाळी ९:३० ते सायं. ६:००आयोजक,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुरंदर.

Post a Comment

0 Comments