Hot Posts

6/recent/ticker-posts

कराटे क्यु बेल्ट व ब्लॅक बेल्ट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन सासवड येथे बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दि. 16 ते 20 ऑक्टोबर 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याचबरोबर जानेवारी 2026 मध्ये पार पडलेल्या क्यू बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.चंद्रशेखर वढणे(अध्यक्ष पुणे जिल्हा भाजपा) तसेच मा.संतोष जगताप(अध्यक्ष स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान,सासवड) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.आपल्या मनोगतात चंद्रशेखर वढणे यांनी कराटे या खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, कराटे हा केवळ एक खेळ नसून तो जीवनशैली आहे. नियमित सरावामुळे शरीर तंदुरुस्त राहते, तसेच मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संयम आणि आत्मविश्वास या गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. तसेच आजच्या काळात आत्मसंरक्षणाची गरज अधिक महत्त्वाची बनली असून, कराटेचे प्रशिक्षण हे प्रत्येकासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. पालकांनीही आपल्या मुलांना अशा क्रीडा प्रकारांकडे प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. खेळाडूंनी पराभवातून शिकत पुढे जाण्याची वृत्ती ठेवावी आणि देश-राज्य पातळीवर यश मिळवण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी, असा संदेश संतोष जगताप यांनी दिला.या यशामागे विद्यार्थ्यांना लाभलेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असून ग्रँड मास्टर प्रदीप वाघोले तसेच सेन्साई तेजस वाघोले, ललित वाघोले, गणेश पापळ आणि पायल वाघोले यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात क्रीडा क्षेत्राबद्दल उत्साह वाढला असून अशा उपक्रमांमुळे भविष्यात अधिक खेळाडू घडतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments