Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी गोगादेव जन्मोत्सवानिमित्त निशान मिरवणूक सासवड प्रतिनिधी: सासवड (ता. पुरंदर) येथील वाल्मीक समाजाचा पारंपारिक गोगादेव जन्मोत्सव रिमझिम पावसात उत्साहात साजरा करण्यात आला. फटाक्याची आतशबाजी, बँड आणि झांज पथकाच्या गजरात शहरातून निघालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. या मिरवणुकीत निघालेले निशाण आणि शिव शंकर रथ सासवड करासाठी लक्षवेधी ठरला. गोगादेव नगरातील मंदिरात महाआरती झाल्यानंतर, सासवडच्या शिवतीर्थ चौकातून या मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी रमेश जगताप, संजय चव्हाण, प्रवीण पवार, आनंद जगताप, हरून बागवान, बंडू काका जगताप, मारुती कुंभार गोगादेव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मोहन चव्हाण, सुमित राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मिरवणूक मार्गावर जयप्रकाश चौकात आरिफ आतार, डॉ. राजेश दळवी, साकेत जगताप आणि चंद्रकांत जगताप यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी विनोद निनारिया, शैलेश चव्हाण, माऊली गिरमे, दादासाहेब भुजबळ, हेमंत ताकवले, जगदीश शिंदे, बापू मुळीक, अंकुश सकपाळ देखील उपस्थित होते. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी जहारवीर गोगादेव याचे भगत खलिफा, नीला घोडा, भंडारी दलप्रमुख, तसेच जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मोहन चव्हाण, सुनील राठोड, दिपक चव्हाण, प्रकाश परदेशी यांनी विशेष मेहनत घेतली. पारंपारिक विधी निशान पूजा आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments