पुरंदर तालुक्यातील वाघीरे महाविद्यालय सासवड येथील संकेत काळे हा विद्यार्थी याना राज्य क्रीडा रत्न पुरस्कार सासवड प्रतिनिधी: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त संजीवनी एज्युकेशनल कल्चरल अँड स्पोर्ट्स रिसर्च फाउंडेशन पुणे महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य क्रीडा रत्न पुरस्कार 2025 संकेत संजय काळे यास जाहीर झाला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप व सचिव अर्चना जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे याबाबत जाहीर केले आहे. मानपत्र, शाल, भारतीय संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा पुरस्काराचे सलग दुसरे वर्ष आहे. पुरस्कार प्राप्त शरीर सौष्ठ पट्टू संकेत काळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचा अंतर महाविद्यालयीन "श्री" हा किताब सलग तीन वेळा प्राप्त केला आहे. तसेच "ज्युनिअर महाराष्ट्र "श्री" सिनिअर महाराष्ट्र "श्री" 'जुनियर मिस्टर इंडिया हे किताब प्रत्येकी एकदा पटकाविले आहेत. जागतिक शरीर सौष्ठ्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत असताना, त्याने मिस्टर युनिव्हर्स या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये रोप्य पदक जिंकले आहे. तसेच त्यांनी सलग दोन वेळा अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेच्या विजेतेपदाचा किताब मिळवला आहे. संकेतने आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त बॉडी बिल्डिंग स्पर्धा मध्ये सहभाग घेत पारितोषिके मिळवली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दुष्काळग्रस्त तालुक्यातील सुपुत्र संकेत पुण्यात गेली आठ वर्षे सराव करत आहे, सध्या तो पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघीरे महाविद्यालय सासवड येथे यांनी राज्यशास्त्र प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.अशी माहिती स्वत: प्रतिनिधिला दिली आहे
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments