श्रीक्षेत्र वीर येथे रक्तदान शिबिर संपन्न. देवस्थान ट्रस्ट व वीरेश्वर प्रतिष्ठानचा संयुक्त प्रेरणादायी उपक्रम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्रीक्षेत्र वीर (ता,पुरंदर)येथे श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर तसेच वीरेश्वर प्रतिष्ठाण वीर यांच्या संयुक्त विद्यमानाने गाव मौजे वीर, ता. पुरंदर, जि. पुणे येथे बालाजी ब्लड बॅंक लोणंद यांचे सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरामध्ये एकूण ४५ लोकांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमास श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर चे चेअरमन राजेंद्रबापु धुमाळ तसेच वीरेश्वर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मंगेश धुमाळ, संपत चव्हाण (प्रतिष्ठानचे सचिव), ॲड. बिपीन शिंदे ( प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार), महेश धुमाळ (तंटामुक्ती उपाध्यक्ष वीर), योगेश शंकर कुदळे (सामाजिक कार्यकर्ते ) तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वीर आणि पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान असल्याचे इतरांना दाखवून दिले व या प्रेरणादायी उपक्रमाला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहे. वीरेश्वर प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक उपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टिकोनातून विधायक कामे करत असतात. आणि वीरेश्वर प्रतिष्ठानच्या प्रत्येक उपक्रमाला देवस्थान ट्रस्टचे भरभरून सहकार्य असते असे वीरेश्वर प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट बिपिन शिंदे यांनी सांगितले.कोट: श्रीक्षेत्र वीर येथील वीर देवस्थान ट्रस्ट नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्याच अनुषंगाने देवस्थान ट्रस्ट व वीरेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त माने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करून सामाजिक दायित्व निभावण्यामध्ये ग्रामीण भागातील ही नागरिक अग्रेसर आहेत हे या माध्यमातून दिसून आले. रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचे देवस्थान ट्रस्ट मार्फत आम्ही मनस्वी आभार मानतो असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बाप्पू धुमाळ यांनी सांगितले.फोटो ओळ: श्रीक्षेत्र वीर (ता,पुरंदर) येथे रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (छाया: बापू मुळीक)
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments