Hot Posts

6/recent/ticker-posts

संगणक साक्षरता म्हणजे एक पाऊल पुढे सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मार्तंड देवस्थान जेजुरी उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा मार्तंड देवस्थान ट्रस्ट जेजुरी यांचे विश्वस्त एडवोकेट विश्वास पानसरे यांच्या माध्यमातून तसेच पुरंदर भाजपाचे उपाध्यक्ष माजी सरपंच दिलीप (आप्पा) कटके पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा घिसरे वाडी भिवरी (ता. पुरंदर )येथे संगणक वितरण कार्यक्रम झाला. यावेळेस बोलताना दिलीप (आप्पा) कटके पाटील म्हणाले , "जगभरात घडत असलेल्या घटनांची माहिती क्षणात सर्वदूर पसरते. कोणत्याही देशात चाललेला खेळाचा सामना घरबसल्या पाहता येतो. कोट्यावधी रुपयांची आर्थिक हिशोबी उलाढाल काही मिनिटात करता येते. माणूस अंतराळात पोचला. चंद्राच्या ही पुढे जाऊन मानवी वस्तू मंगळावर पोचली. या सर्व चांद्रयान , मंगळयान मोहिमांचा कार्यभार संगणकाच्या माध्यमातूनच पूर्णत्वाकडे गेला आहे. ग्राफिक्स डिझाईन बँकांचा ताळेबंद फोटोग्राफी व चित्रीकरण , सिनेमा यासरख्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा संगणक हा जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. संगणक साक्षरता म्हणजे एक पाऊल काळाच्याही पुढे आहे."* कार्यक्रमासाठी भिवरी गावचे मा उपसरपंच जगन्नाथ दादा कटके पाटील , मा उपसरपंच तुकारामबुवा कटके पाटील , दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष संभाजी आबा नाटकर , गोसावी बुवा तरूण मंडळाचे मा अध्यक्ष पैलवान शेखरबापू कटके पाटील , संतोष घिसरे , मनोहरबापू घिसरे , विकास कटके पाटील , ईश्वर कटके पाटील , आदर्श शिक्षक सचिन बोरावके सर , धोंगडे मॅडम आदींसह ग्रामस्थ नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments