वाघिरे महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीतर्फे मु.सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील खेळाडूंनी तीन सुवर्ण व तीन रौप्य पदक पटकावून दैदिप्यमान कामगिरी केली. फ्री स्टाईल कुस्ती प्रकार६१ किलोग्रॅम वजनगट : श्रीनाथ डांगे - सुवर्णपदक, ७४ किलोग्रॅम वजनगट: प्रकाश कार्ले - सुवर्णपदक, ९७ किलोग्रॅम वजनगट: प्रतीक जगताप - सुवर्णपदक, ९२ किलोग्रॅम वजनगट: यशराज काळे - रौप्यपदक ग्रीकोरोमन कुस्ती प्रकार ८२ किलोग्रॅम वजनगट: अजिंक्य शिंदे - रौप्य पदक, ९७ किलोग्रॅम वजनगट: विशाल जाधव - रौप्यपदक वरील सर्व खेळाडूंची बारामती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर घवघवीत यशाबद्दल खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ.बी.यु.माने, डॉ. संजय झगडे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ यांनी अभिनंदन केले. सर्व विजेते खेळाडू श्री शिवाजी प्रसारक मंडळ, सासवड संचलित छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे प्रशिक्षक पै.तानाजी बोडरे व पै.माऊली खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments