परिंचे येथे जैविक निविष्ठा केंद्राचे उद्घाटनस्थानिक शेतकऱ्यांना जैविक शेतीसाठी मोठा आधार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: परिंचे (ता. पुरंदर) येथे बुधवार, दि. 24 सप्टेंबर रोजी श्री शिवशंभो शेतकरी गट यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या जैविक निविष्ठा केंद्राचे उद्घाटन आमदार विजय शिवतारे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी माननीय आमदारांनी सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने काळाची गरज असणारा महत्त्वाचा विषय हाताळल्याचे नमूद करून गटाचे कौतुक केले व हा प्रश्न अधिवेशनामध्ये ऐरणीवर आणून शासनाला शेतकऱ्यांच्या जैविक निवेस्टन बाबतच्या अडचणी निवड उपाय करण्यास भाग पाडण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामागे परिंचे मंडल कृषी कार्यालय, ग्रामपंचायत परिंचे व पाणी फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.आजच्या घडीला संपूर्ण जगभरात जैविक किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित होत आहे. केंद्र व राज्य शासनही अशा शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरणे राबवत आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लागणाऱ्या जैविक खते, बुरशीनाशके, कीटकनाशके यांसारख्या निविष्ठा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांची अडचण निर्माण होते. शेतकऱ्यांना या निविष्ठांसाठी विद्यापीठे किंवा संशोधन संस्थांकडे धाव घ्यावी लागते, परिणामी जैविक शेतीकडे त्यांचा कल अपेक्षेइतका वाढत नाही.हीच गरज लक्षात घेऊन श्री शिवशंभो शेतकरी गटाने परिंचे येथे जैविक निविष्ठा केंद्र उभारले आहे. या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना विविध विद्यापीठांनी विकसित केलेली जैविक उत्पादने स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच जैविक खते व औषधांच्या वापराबाबत शास्त्रशुद्ध मार्गदर्शनही केले जाणार असून, शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे.उद्घाटन प्रसंगी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ, पाणी फाउंडेशनचे डी. एल. मोहिते, मंडल कृषी अधिकारी दुर्गुडे , सहाय्यक समगीर व त्यांचे सर्व सहकारी, ग्राम विकास अधिकारी शशांक सावंत, सरपंच श्रीमती नाईकनवरे, उपसरपंच प्रवीण जाधव, व सर्व सदस्य. पंचक्रोशीतील मान्यवर सुशील कुमार जाधव, समीर जाधव, मयूर मुळीक, नवले सर, बबूसो माहूरकर, सागर करवंदे, कृषी सखी महिला शेतकरी गटाच्या सर्व सदस्या, तसेच शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाणी फाउंडेशनचे मयूर साळुंखे यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद जाधव यांनी तर आभार प्रदर्शन शशिकांत जाधव यांनी केले.या जैविक निविष्ठा केंद्राच्या स्थापनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना जैविक शेतीसाठी आवश्यक संसाधने सहज उपलब्ध होणार असून, टिकाऊ शेतीच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments