माहूर मध्ये प्रभात फेरी पथनाटया द्वारे एड्स जनजागृती ... सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित माहूर माध्यमिक विद्यालय माहूर (ता. पुरंदर) जिल्हा पुणे या विद्यालयाच्या वतीने माहूर मध्ये आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेन अंतर्गत शाळा /महाविद्यालय / ग्रामपंचायत स्थर संवेदीकरण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय सासवड अंतर्गत उपकेंद्र माहूर व माहूर माध्यमिक विद्यालय माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही ,टी बी , सिफिलीस , गुप्तरोग इत्यादी आजारांबद्दल जनजागृती करण्यात आली . यावेळी ग्रामीण रुग्णालय सासवडचे समुपदेशक गोरख शिंगटे म्हणाले ,काही चांगल्या सवयी लावून एच .आय. व्ही .बरोबर निरोगी आणि दीर्घायुष्य जगा .एच आय व्ही एड्स कायदा 2017 च्या अंतर्गत असणारे तुमचे हक्क जाणून घ्या आणि मुक्तपणे जगलात का ?गुप्तरोगांवर औषधोपचार उपलब्ध आहेत सुरक्षा क्लिनिक किंवा लैंगिक व प्रजनन आरोग्य सेवांची माहिती घ्या . ए .आर .टी .चे औषध वायरसला शरीरात वाढण्यापासून प्रतिबंधित करते आणि एचआयव्ही संक्रमित व्यक्तीला निरोगी ठेवण्यास मदत करते .ए आर टी केंद्रात सामील होण्याचे अनेक फायदे आहेत एआरटी चे औषध निरोगी आणि दीर्घायुष्य जगण्यास मदत करते . एचआयव्हींनी संक्रमित व्यक्तींमध्ये होणाऱ्या संधी साधू संक्रमणांपासून संरक्षण करणे ,जोडीदारांमध्ये एचआयव्ही होण्याची शक्यता कमी करते .आपण ए आर टी चा अवलंब करून आपण एच आय व्ही पॉझिटिव्ह असून देखील निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगू शकतो .एच आय व्ही चा उपचार आणि त्याच्याशी निगडित सर्व तपासण्या आपल्या जवळील एआरटी केंद्रावर मोफत उपलब्ध आहेत . अशी माहिती त्यांनीयावेळी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना दिली . माहूर माध्यमिक विद्यालयातील इ . ९वीच्या विद्यार्थ्यांनी एड्सवर पथनाट्य सादर केले . गावातून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून जनजागृती केली . या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार ,माहूर गावच्या उपसरपंच मेघाताई जगताप ,ग्रामीण रुग्णालय सासवडच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वाती वाघोले ,आशाताई वर्कर प्रीती जगताप ,संजय जगताप ,शरद चव्हाण ,बंडा बापू जगताप , राजेंद्र चव्हाण ,माऊली जगताप ,प्रताप माहुरकर ,बाळू गोळे ,शिवाजी अधिकारी त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र भोसले यांनी तर आभार पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामप्रभू पेटकर यांनी मानले .
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments