सासवड येथे डॉक्टरवर प्राणघातक हल्ला व खंडणीचा प्रयत्नसात जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहर परिसरात एका नामांकित डॉक्टरवर खंडणीसाठी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक व ग्रामपंचायत राजकारणातील वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सुभाष दत्तात्रय शिवतारे (वय ३६, व्यवसाय – डॉक्टर, जनहीतार्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोडीत नाका, सासवड–हिवरे रोड, रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीनुसार, आरोपी महेश मारुती राऊत हा गेल्या तीन वर्षांपासून डॉक्टर शिवतारे यांना मानसिक त्रास देत असून सोशल मीडियावर बदनामीही करत होता. दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, डॉक्टर शिवतारे हे त्यांच्या पार्टनर गणेश किसन शेंडकर यांच्यासोबत दुचाकीवरून सासवडहून सुपे खुर्दकडे जात असताना मौजे सासवड हद्दीत दत्तात्रय भोंगळे यांच्या बंगल्याजवळ आरोपी महेश राऊत याने त्यांची दुचाकी अडवली.“तू ग्रामपंचायत राजकारणात माझे ऐकत नाहीस, त्यामुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन. तू बोगस डॉक्टर आहेस. तुझ्या हॉस्पिटलची बदनामी करून तुझे करिअर संपवीन. मी केलेला अर्ज मागे घ्यायचा असेल तर ५ लाख रुपये दे,” अशी धमकी देत आरोपीने शिवीगाळ केली व डॉक्टर शिवतारे यांना मारहाण केली. रस्त्यावरील काठीने केलेल्या हल्ल्यात डॉक्टरांच्या डाव्या हाताच्या करंगळीला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले.भांडण सोडवण्यासाठी शुभम चंद्रकांत जाधव व आकाश चंद्रकांत जाधव हे दोघे मध्यस्थीला आले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये शुभम जाधव यांच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले.यानंतर फिर्यादी व जखमी सासवड पोलीस ठाण्याकडे जात असताना भोंगळे वस्ती परिसरात आरोपी स्वप्नील सुधाकर राऊत व लोकेश महेश राऊत हे चेतक दुचाकीवरून आले. लोकेश राऊत याने हातातील काठीने आकाश जाधव याला मारहाण करून जखमी केले.औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सासवड येथे गेल्यानंतरही आरोपींचा धुडगूस सुरूच राहिला. तेथे अमोल नामदेव पवार, लोकेश महेश राऊत, आदित्य सुनील राऊत, सचिन सुधाकर राऊत, जितेंद्र मारुती राऊत व ओम जितेंद्र राऊत यांनी शुभम व आकाश जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (२०२३) अंतर्गत खंडणी, मारहाण, प्राणघातक हल्ला, धमकी व दंगलसदृश प्रकाराबाबत विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास करत असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments