Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड येथील वाघीरे विद्यालयात दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज सासवड ता. पुरंदर)इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा आज सुरू झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सासवड नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी गोविंद लाखे , वाघीरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.पूजा जोग , उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे , पर्यवेक्षिका अर्चना लडकत, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुरंदर तालुका अध्यक्ष शिवहार लहाने, पत्रकार बापूसो मुळीक या सर्वांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी परीक्षार्थींचे औक्षण देखील करण्यात आले.

Post a Comment

0 Comments