Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या सफाई कामगारांचा सासवड नगर परिषदेच्या गेट समोर आंदोलन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सफाई कामगारांच्या प्रलंबित वेदनाच्या मागणीसाठी सासवड नगर परिषदेच्या समोर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे 1,00 सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी दि. 18 रोजी सकाळी काही वेळ पालिकेच्या गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते, यावेळी नगराध्यक्षा आनंदी काकी जगताप आणि मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी मध्यस्थी करत तोडगा काढल्यानंतर, त्या कामासाठी सुरुवात केली होती ,सफाई कामगारांची वेतन निधीचे एंटरप्राईजेस या ठेकेदार कंपनीकडून पाच महिने पासून थकल्याने, कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, यावेळी भाजप शहराध्यक्ष आनंद जगताप व विरोधी गटनेते मंदार गिरमे यांनी ठेकेदारावर कारवाईची मागणी केली असता, नगराध्यक्षा जगताप म्हणाल्या तातडीने एका महिन्याचा वेतनाचा धनादेश ठेकेदाराला पालिकेच्या नफा फंडातून दिलेला आहे, शासकीय कालखंडातील थकीत देणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आम्ही सकारात्मक आहोत मात्र शहर स्वच्छतेसाठी कामगारांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, गेल्या तीन वर्षापासून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी शासनाकडून मिळत नसल्याकारणाने, वेतन लांबल्याचे मुख्य अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी स्पष्ट केले असून, स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील साडेसात कोटी रुपयांचे बक्षीस सुद्धा रक्कम अद्याप मिळा लेली नाही, तरीही वीर योजनेचे दर महिन्याचे वीज बिल आणि कर्मचाऱ्यांचे पगार पालेखीच्या तुटपूजा नफा फंडातून केले जात आहेत, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर ठेकेदाराची प्रलंबित देणी दिली जात आहेत, असे डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर जगताप,गटनेते अजित जगताप, नगरसेवक राजन जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, न्यानेश्वर जगताप, प्रदीप राऊत आदि नगरसेवक यावेळी उपस्थित होते व नागरिक सुद्धा उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments