' माझी वसुंधरा अभियानामध्ये' राज्यात सासवड नगर परिषदेचा दुसरा क्रमांक; तर सासवड नगर परिषदेला तीन कोटींचे बक्षीस वितरण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पर्यावरणाचे जतन व संवर्धनासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा 4.0 अभियानामध्ये गत वर्षी सासवड नगर परिषदेने 25 ते 50 हजार लोकसंख्या गटात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे, या यशाबद्दल नगरपरिषदेला तीन कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून, बक्षीस रकमेपैकी दीड कोटीचा पहिला हप्ता नगर परिषदेला प्राप्त झालेला आहे, त्याचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी दिनांक 21 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, हे यश नगर परिषदेने गतवर्षीच्या अभियानामध्ये मिळवलेले होते, मात्र त्यावेळी प्रशासकीय राजवट असल्याने, पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते, यावर्षीच्या नवीन अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सासवड नगरपरिषदेला विशेष निमंत्रित करण्यात आले असून, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हा पुरस्कार स्वीकारणार असल्याचे, पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. भूमिजल, वायू ,अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या पाच तत्वावर आधारित या अभियानामध्ये गतवर्षी राज्यातील 22,632 स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता ,सासवड नगर परिषदेने सौर ऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर, हार्वेस्टिंग, भूजल पुनर्भरण, घनकचरा व्यवस्थापन आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण या मध्ये केलेल्या प्रभावीपणे आणि मिशन मोड कामामुळे पुरस्कार मिळाला असल्याचे, पालखीच्या वतीने सांगण्यात आले आहे, शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था आणि शहरातील जागृत नागरिकांच्या सहभागामुळेच सासवडला हा बहुमान मिळाला असल्याची मिळालेल्या, निधीतून आपण शहरात शाश्वत विकासाचे नव नवीन प्रकल्प राबवत आहोत, डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद सासवड नगरपरिषद निसर्गाशी असलेल्या, कटीबद्धपोटी पुढेही अशीच कार्य करत राहील, हे सर्व अधिकारी कर्मचारी आणि सासवडकर नागरिकांचे आहे, स्वच्छता सोबतच पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ आणि आपण अशीच अखंड सुरू ठेवू, आनंदी काकी जगताप नगराध्यक्षा सासवड नगर परिषद.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments