Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी महाराष्ट्र केसरी साठी शनिवारी निवड चाचणीच्या स्पर्धा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025- 26 साठी पुरंदर तालुक्यातून मल्लांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शनिवारी दि. 21 रोजी सासवड तालुका पुरंदर येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव रवींद्र पंत जगताप यांनी दिली. निवड चाचणी स्पर्धेच्या नियोजनाबाबत तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या सूचनेप्रमाणे, सदस्यांची सासवडला बैठक झाली वरिष्ठ आणि बालगटात या निवड स्पर्धा होणारा चआहेत 21 फेब्रुवारीला सकाळी नऊ ते दहा या वेळेत स्पर्धकांचे वजन घेतले जाणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी सात पर्यंत या निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत बालगटातील स्पर्धा गादी विभागात तर वरिष्ठ गटातील स्पर्धा गादी आणि माती विभागात वजन घटनिहाय होणार आहेत, सर्व कुस्त्या प्रेक्षणीय होणार असल्याचे रवींद्र पंत जगताप यांनी सांगितले आहे. बालगटासाठी जन्मतारीख 1 जानेवारी 2012 ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत असावी, वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, किंवा पासपोर्ट देणे बंधनकारक आहे, सहभागी होणाऱ्या मल्लांची जिल्हा कुस्तीगीर संघाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे, नोंदणी नसल्यास जिल्हा कुस्तीगर संघाकडे अर्ज व रजिस्ट्रेशन फी भरून नोंदणी करता येईल, असे सचिव रवींद्र पंत जगताप यांनी प्रतिनिधीला ही सर्व माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments