जमीन जुमला कायद्यात बसवा - ॲड. नेवसेबाल विकास मंदिर शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन सासवड प्रतिनिधी: सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बाल विकास मंदिर आणि जन अदालात संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण या पवित्र महिन्याचे औचित्य साधून महिला पालकांसाठी हळदी कुंकू तसेच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कायदा जनजागृती शिबीर अंतर्गत सासवडच्या बाल विकास मंदिर शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन आयोजित केले होते. सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला असता पालकांना कायद्याची माहिती असावी या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सरस्वती पूजन करून या व्याख्यानाला सुरुवात झाली. या व्याख्यानासाठी जन अदालात संस्था, पुणे चे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे यांनी बचत आणि गुंतवणूक , पीक पाणी शेरा, आपल्या शेतीचा किंवा मालमत्तेचा सातबारा नियमित काढत राहणे , मालमत्तेसंदर्भात असणारे विविध उतारे, वतनदारी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आपली मालमत्ता सुरक्षित राहावी म्हणून ती कायद्यात बसवा तसेच , सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होऊ नये यासाठी आपली न्यायव्यवस्था सुदृढ आहे. असे ॲड. नेवसे म्हणाले. महिलांचे अधिकार आणि हक्क याविषयावर पुणे बार असोसिएशन च्या सचिव ॲड. भाग्यश्री गुजर–मुळे यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी कौटुंबिक कायदा, महिला सुरक्षितता, बालकांचे लैंगिक छळ, पालकांचा संरक्षण कायदा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य याविषयी मार्गदर्शन केले. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आपण न्यायालयात धाव घेऊ शकतो. त्याविषयी महिलांच्या बाजूने कायदे आहेत असे ॲड. गुजर–मुळे म्हणाल्या. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांनी केले. यावेळी, वाघीरे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा विद्या टकले, शाळेच्या माजी विद्यार्थिनी ॲड. गौरी जगताप आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन माधुरी जगताप, अश्विनी कदम, राजगौरी जगताप, माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन, शीतल चौधरी, मीना खोमणे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी कदम यांनी केले. आभार मंजुषा चोरामले यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments