Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदरच्या शैक्षणिक विकासातमुख्याध्याक दत्ताराम रामदासी सर यांचे मोठे योगदान - दादा वेदक(म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड चे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न) सासवड प्रतिनिधी:म. ए. सो. वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड चे मुख्याध्यापक श्री. दत्ताराम रामदासी सर हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गुरुवार दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने सासवड नगरपरिषदेच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या सासवडच्या वाघीरे विद्यालयात जिल्ह्यात एक नंबर शैक्षणिक सुविधा देणारे विद्यालय करण्याचा संकल्प रामदासी सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण सर्वजन करूया असे मत आपल्या मनोगतातून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष तसेच सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले. म. ए. सो.च्या वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम राजाराम रामदासी यांचा सेवापुर्ती समारंभ ३१ जुलै रोजी सासवड येथील आचार्य अञे सांस्कृतिक सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्रक, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पुरंदर-हवेलीचे आमदार विजयबापू शिवतारे, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यकार्याध्यक्ष भगवानराव साळुंखे, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंञी दादा वेदक, भाजपाचे युवा नेते बाबाराजे जाधवराव, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, विश्व हिंदू परिषदेचे राजाभाऊ चौधरी, वाघीरे विद्यालयाच्या शालासमितीचे अध्यक्ष अँड. सागर नेवसे, महामात्र सुधीर भोसले हरिभाऊ मिराजदार डॉ. संतोष देशपांडे, डॉ.गोविंद कुलकर्णी, पर्यवेक्षिका अर्चना लडकत, भाजपा चे युवा नेते अजिंक्य टेकवडे, संतोष जागताप, माजी नगरसेवक सचिन भोंगळे,अभिजीत जगताप, बाळासाहेब भिंताडे, नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, सुधाकर जगदाळे, वसंतराव ताकवले, दिपक भोसले, दत्तात्रय गायकवाड, तुकाराम मुळीक, गिरीश जगताप, आनंद जगताप, अमोल जगताप, श्रीकांत देशपांडे, माणिक निंबाळकर, संदिप टिळेकर, राजेंद्र बढे यांच्यासह वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्याकडे गुणवंत शिक्षक आहेत. पण परवडणारे व गुणवत्तेचे शिक्षण देण्याचाही आपण प्रयत्न करु या यासाठी रामदासी सरांचा असणारा मोठा अनुभव व ओळखीचा वापर संस्था वाढीसाठी करावा असे बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले. भारत माता विश्वाच्या शिरस्थानी चर्चेत आहे. शिक्षण क्षेत्रात सुद्धा भारत देश अखंड विश्वाला मार्गदर्शक ठरेल. या ठिकाणी दत्तारामजींच्या तिन पिढ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करीत आहेत तसेच दत्ताराम रामदासी यांच्या जीवनाचा आलेख बदलत असून पुरंदर तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात रामदासी सर यांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन दादा वेदक यांनी केले. बाबासाहेब शिंदे मएसो चे अध्यक्ष झाले आणि त्यांनी संस्थेचा विकास आराखडा करुन शाळेचा कायापालट केला असल्याचे बाबाराजे जाधवराव यांनी सांगितले.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम रामदासी सरांनी केले. म्हणून आज वाघीरे शाळा नावारूपाला आली. तसेच त्यांनी शिक्षण क्षेत्रात गेली तेहतीस वर्ष मनोभावे सेवा केली असल्याचे आ.विजय शिवतारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे यांनी केले. प्रशस्तिपत्रक वाचन संगीता रिकामे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सेवापूर्ती गीताने झाली. सुञसंचालन मंगल कोकरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय गणेश पाठक यांनी करून दिला तर आभार अर्चना लडकत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वाघीरे विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, एन. सी. सी.चे विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांनी यांनी योगदान दिले.

Post a Comment

0 Comments