Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ समर्थकांमध्ये रसद वाटपावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाद 95 टक्के शेतकरी पुरंदर तालुक्यात विमानतळ विरोधावर ठाम सासवड प्रतिनिधी :पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रश्नावर आता तालुक्यात वातावरण तापताना दिसत आहे एका बाजूला सात ही गावातील शेतकरी आम्ही कुठल्याच मोबाईलला जमीन देणार नाही आणि शंभर टक्के शेतकरी आमच्यासोबत आहेत असे सांगत असताना दुसऱ्या बाजूला मात्र प्रशासन 80% शेतकरी समती देत असल्याचे दावे करत आहे खऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला असता शेतकऱ्याची बाजू खरी असल्याचे जाणवत आहे कारण प्रशासनाकडे किती सहमती पत्र आलीत याची मागणी केली असता त्यांच्याकडे एकही संमती पत्र उपलब्ध नाही असे दिसते परंतु शासनाच्या वतीने शेतकऱ्याची मने वळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत आहेत सात गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली असता सात गावातील काही 810 लोक असे नेमले आहेत ज्यांना कंटाळाला विरोध करणाऱ्या लोकांची मने वळवण्यासाठी काही राजकीय व प्रशासकीय लोकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे बोलले जात आहे खरंतर या गोष्टीचा कुठलाही पुरावा नसला तरी शेतकऱ्यांचा विरोध पाहता प्रशासनाने थोडे हातबल झाल्यासारखे वाटत आहे कारण जमिनीची टक्केवारी पहिली असता इन्वेस्टर च्या जमिनी ह्या फक्त पाच टक्के ते 7% इतक्या आहेत सर्वांनी जरी संमती दिली तरी जवळ जवळ 93% स्थानिक शेतकरी आहेत आणि ते विरोधावर ठाम आहेत हे प्रशासनाची चर्चा देखील करत नसल्याने असले हातखंडे आपण वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भविष्यात अशा चार दोन लोकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments