वाघीरे महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी सासवड प्रतिनिधी: महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ज्यांनी महत्त्वाचे योगदान दिले अशा लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीअसे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी बोलताना लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते असून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली.तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वर कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी बनले त्यांना दलित साहित्याचे संस्थापक म्हणूनही श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत या प्रसंगी बोलताना प्रा. नितीन लगड यांनी मांडले. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास समितीचे प्रमुख प्रा. भुतकर सर यांनी केले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख सहकारी प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. किशोर लिपारे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. पूनम काळे यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments