पुरंदर तालुक्यात भाऊबीज अनोखी पद्धतीनुसार साजरी तर सासवडच्या तुकाई माता मंदिरात रंगले दिवाळी पहाट चे स्वर.... सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवडकर रसिकांसाठी भाऊबीजेचे निमित्त साधुन शहरातील लांडगे आळीतील तुकाई माता मंदिरात स्वर साधक प्रस्तुत भूपाळी ते भैरवी या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येथीलप्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने याचे आयोजन केले गेले होते. पुरंदरमधील स्थानिक कलाकार व मंडळींनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण केले. सुवर्णा होले, मच्छिंद्र दीक्षित, गुलाब बुध्ये, संजय काटकर, स्वरा व ज्ञानेश्वरी दीक्षित या गायककलाकारांनी विविध रचना सादर करून टाळ्या घेतल्या, प्रथम तुला वंदितो ने सुरू झालेल्या या संगीत प्रवासातनिघालो घेऊन दत्ताची पालखी, पायोजी मैने राम रतन, एक राधा एक मीरा, ऐशी लागी लगन, ए मेरे वतन के लोगो अशा विविध स्वरूपातील गीतांचे सुंदर सादरीकरण झाले. पांडुरंग श्रीरंग भज रे मना या भैरवीने व आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.प्रख्यात तबला वादक राजेंद्र दुरकर यांच्यासह समद पठाण, चंदुलाल तांबोळी, स्वप्नील जगताप, मच्छिंद्र दीक्षित या वाद्यवृंदानी सुंदर संगीत साथ दिली. ह भ प बाळासो फडतरे (गुरुजी) यांचे समयोचित सूत्र संचालन कार्यक्रमाची उंची वाढवून गेले. मध्यंतरात माजी आमदार संजय जगताप , औदुंबर महाडिक यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या नीलिमा दिदी यांनी मान्यवरांचे भाऊबीज निमित्त औक्षण केले.माजी आमदार संजय जगताप,शेखर वढणे,सुहास लांडगे, संजय चौरे, ॲड भगवान होले, डॉ राजेश दळवी, मोहन बागडे, अनिल कदम, आनंद (भैय्या )जगताप, हेमंत ताकवले ,बापू मुळीक,दत्तात्रय भोगळे,जगदिश शिदे,इंदिरा पवार, कल्याणी चिंबळकर, हरीशेठ शेवते संगीता लांडगे, सखाराम लांडगे, ॲड सुदाम सावंत, ॲड नितीन जाधव, डॉ संदीप होले , मोहनअण्णा जगताप, माऊली गिरमे, तानाजी सातव यांसह मोठ्या संख्येने रसिकांनी या सुंदर कार्यक्रमास हजेरी लावली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments