पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 3,400 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,311दर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवारी दि.22 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3,400 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,311 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे, दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 3,400 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,800 तर सरासरी 3,100 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,311 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,500 तर सरासरी 2,905 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले,सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, शरयू वाबळे, भाऊसो गुलदगड, पंकज निला खे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर आदी उपस्थित होते. गुळाला 4,450रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 296 बॉक्स 59 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,450 कमाल दर 4,100 रुपये तर साधारण4,225 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 2,800,3,400,3,100. बाजरी 2,600,3,500, 3,050. गहू 2,500,3,311,2,905. तांदूळ 1) 4,500,5,300,4,900.2)4,200,4,800,4,500.हरभरा 4,800, 5,410,5,105.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments