Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड करांचा दीपसंध्याला उदंड प्रतिसाद सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहामध्ये रविवारी दि. 19 रोजी पुरंदर मेडिकल असोसिएशन, ग्रामीण संस्था पुरंदर- हवेली व रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या वतीने दीपावली निमित्त दीपसंध्या २०२५ च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. विनायक खाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पराग चौधरी यांनी निवेदन केले, अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून प्रतिबिंबित करणारी रचना माझी मैना, गावाकडे राहिली ही छक्कड सूर नवा ध्यास नवा फेम विक्रम कदम यांनी गायली, वन्स मोर मागत या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. तसेच जी युवा संगीत सम्राट फिल्म व सेक्स फोनिस्ट जेजुरीचे प्रथमेश मोरे यांनी दर्जेदार सॅक्सो फोनचे वादन केल्या नंतर, सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. राधा ही बावरी, परदा हे परदा, दा गाता रहे मेरा दिल, मल्हारवाली मी होणार सुपरस्टार आणि विनल देशमुख व रूपाली घोगरे व विक्रम कदम गायकांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. यावेळी माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते, भाजपचे युवा नेते बाबाराजे जाधवराव, राजेंद्र काळे, प्रदीप पोमण, अनिल उरवणे, पुरंदर मेडिकल अध्यक्ष डॉ. प्रवीण जगताप, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. प्रमोद धनावडे, भाजप डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुमित काकडे, डॉ. संजय रावळ, डॉ. सचिन निरगुडे, डॉ. शर्मा केंजळे, डॉ. विनायक बांदेकर, डॉ. संदीप होले, शरद पाडसे, डॉ. उमाकांत ढवळे, संदीप टिळेकर, केशव काकडे, सुनीता कोलते, अशोक टिळेकर, बंटी जगताप, तानाजी झेंडे,पत्रकार ताकवले हेमंत, गणेश मुळीक,जीवन कड, संभाजी महामुनी, बापू मुळीक, ए. टी. माने, दत्ता भोगले,जगदिश शिदे, संदिप जगताप आदी उपस्थित होते. सह्याद्री हॉस्पिटल हडपसर व आनंदी मल्टी पेशालिटी हॉस्पिटल जेजुरी यांनी या प्रायोजकत्व स्वीकारले.

Post a Comment

0 Comments