पुरंदर तालुक्यामध्ये श्री क्षेत्र वीर येथे दर्शनासाठी लक्ष्मीपूजनाच्या निमित्त भाविकांच्या रांगा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: अश्विन अमावस्या तसेच लक्ष्मीपूजन सणाचे अवचित्य साधून, श्री शेत्र वीर ता. पुरंदर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी देऊळ वाड्यामध्ये सकाळपासून रांगा लावल्या होत्या, दीपावली सणानिमित्त देऊळ वाड्यात रोज संध्याकाळी फुलांची आरास करण्यात येत असून, दगडी कासवावर आकर्षक रांगोळी काढण्यात येते, अमावस्येच्या निमित्ताने पहाटे साडेचार वाजता देवाला अभंग स्नान घालून, महापूजा करण्यात आली, सकाळी सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला, सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकातर्फे देवाला अभिषेक करण्यात आले, सकाळी दहा वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या, देऊळ वाड्यामध्ये दगडी कासवावर सालकरी, गोसावी मंडळीचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता, सकाळी बारा वाजून पंधरा मिनिटांनी धूप आरती होऊन, मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला .दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. दिवाळी पाडव्याला देवाचे सोन्याचे दागिने परिधान करण्यात येणार असून, देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसरात विविध विकासकामे प्रगतीपदावर असून, श्रीनाथ बस थांब्याचे काम अंतिम टप्यात आले असल्याचेही देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अमोल धुमाळ यांनी सांगितले आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त सचिव काशिनाथ धुमाळ, विश्वस्त प्रमिला देशमुख, सुनील धुमाळ, विराज धुमाळ, अमोल धुमाळ, श्रीकांत थिटे, बाळासो समगीर, जयवंत सोनावणे, अलका जाधव आदी विश्वस्त मंडळ तसेच सल्लागार मंडळ उपस्थित होते. अमावस्येला दर्शनासाठी आलेल् आलेल्या भाविकांना भगवान धुमाळ, नामदेव धुमाळ, एकनाथ सूर्यवंशी, जयसिंग होले यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ व उपाध्यक्ष अमोल धुमाळ यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments