Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या ठिकाणी ममता बाल सदन आश्रमामध्ये भाऊबीज निमित्त दिवाळी फराळ वाटप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: समता कृती प्रतिष्ठान व साप्ताहिक समता कृती यांच्या वतीने गरिबाची दिवाळी उपक्रमांतर्गत ममता बाल आश्रम कुंभारवळण ता. पुरंदर येथील मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला, या उपक्रमाचा प्रारंभ जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आला.गेली 31 वर्षापासून दिवाळी सणाचा फराळ एकत्र करून, येथील मुलांची गोड दिवाली करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक दिगंबर कदम, महेश पेशवे यांनी सांगितले. जेजुरी पोलीस ठाणे मधून सकाळी साडेदहा वाजता या उपक्रमास प्रारंभ झाला, साकुर्डे, बेलसर, भोंगळे मळा, बेलसर, पारगाव वाघापूर मार्गे कुंभारवळण येथे सायंकाळी उपक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी अध्यक्ष एडवोकेट राहुल कदम, एडवोकेट सचिन कदम, शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे, माजी प्राचार्य पोपटराव ताकवलेे, माजी सैनिक दिलीप दोडके, परेश पेशवे, बाळासो कुंभार, सुहास बेंगाळे, संदिप टिळेकर, सुजाता गुरव, ममता बालक सदनचे प्रमुख दिपक गायकवाड, विद्यमान सरपंच मंजुषा गायकवाड, पत्रकार ए.टी माने, पत्रकार बापू मुळीक, ममता बाल सदनचे कर्मचारी वर्ग, बहुसंख्येने मुलींची उपस्थिती आदी उपस्थित होते. शेतकरी देवानंद जगताप, उद्योजक नारायण होले यांचे या उपक्रमास सहकार्य लाभले. रघुनाथ वावळ यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments