Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यात शिवसेना शिंदे गट विरूद्ध भाजप सामना बेलसर गटात रंगतदार होणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ आंतरराष्ट्रीय मुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये रंगतदार होणार आहेत, पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बेलसर गटात व पंचायत समितीच्या बेलसर व माळशिरस गणामधील लढती या विमानतळामुळे अत्यंत चुरशीच्या होतील अशी तरी सध्याचे चित्र आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यातच मुख्य लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे ,भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती राज्यातील सत्तेत एकत्र असली, तरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्त स्थानिक पातळीवर त्यांच्या पक्षाचे नेते याची निवडणूकीसाठी प्रतिष्ठापनाला लावताना दिसत आहेत, त्यामुळे महायुतीतच वर्चस्वाच्या संघर्षासाठी होणार आहे, त्यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते गावोगावी दवरे करून, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापवत आहेत, मेळावे, गाव भेट दौरे विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क केला जात आहे, बेलसर गट तसेच पंचायत समितीच्या बेलसर आणि माळशिरस गणावर मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार संजय जगताप यांचे काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते, परंतु जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे, तर पंचायत समिती सदस्य या दोन्ही महिला व माजी आमदार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने, सध्या तरी भाजपचे पारडे बेलसर गटात व बेलसर माळशिरस मध्ये जड आहे, त्याचाच फायदा उठवत मतभेद व अंतर्गत कुरगुडीचा फायदा आमदार विजय शिवतारे यांनी घेतला असून, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना या मतदारासंगामध्ये खूप प्रयत्न करावे लागणार आहेत, विमानतळाचा प्रश्न, सासवड ते रिसेपिसे पर्यंत काम चालू असणारे रोडचे यामध्ये सामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रामुख्याने पुढाऱ्यांनी सध्या तरी तीन गटातील प्रयत्न शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार वर्गासाठी अनुकूल असे वातावरण मिळालेले नाही, परंतु भाजपमधील विमानतळाच्या व सासवड रिसेपिसे पर्यंत रोडचे काम चाललेली यासाठी प्रत्येक वेळी लक्ष देऊन सोडवणूक केली आहे, परंतु शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याकडे फारसे लक्ष दिले जात नाही ,तर आत्ता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गाव भेट दौरे चाललेले असले तरी, तीनही पक्षाला खूप झगडावे लागणार आहे ,तर प्रामुख्याने लढत शिवसेना शिंदे गट व भाजपमध्येच सामना रंगतदार होणार आहे, बेलसर गटातून दत्ता झुरंगे विजयी झाले तर बेलसर गणात सुनिता कोलते तर माळशिरस गणामध्ये आरती यादव या काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते, त्यावेळी शिवसेनेला मोठा धक्का बसला होता, तर आता ही निवडणूक शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट,शी लढत प्रतिष्ठेची व राजकीय दृष्ट्या अस्तित्वाची बनली आहे, बेलसर गट सर्वसाधारण राखीव झाल्याने, यामध्ये पुरुषाचे वर्चस्व पस्थापित झाले असून, गुडघ्याला बाशिंग बांधल्याने प्रचार जो चालू सुरू झाला आहे या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार विजय शिवतारे, राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, संभाजी झेंडे, जालिंदर कामठे, भाजपचे माजी आमदार संजय जगताप, बाबा जाधवराव, गंगाराम जगदाळे व माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादी शरद पवार गट विजय कोलते, सुदाम इंगळे, माणिक झेंडे यांच्या भूमिकेतील लक्ष लागले आहे, तर सध्या तरी शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपकडून जिंकून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सध्या जोरात चालू आहे, बेलसर हा माजी आमदार संजय जगताप यांचा बालेकिल्ला समजला जातो त्याला सुरूग लावण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट यांनी जोरदार पद्धतीने व्यहरचना केली जात आहे, हा गण सर्वसाधारण साठी राखीव झाल्याने, या गणांमध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे, राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजला जाणारा बेलसर हा गण सर्व साधारण झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलेल्या अनेकांची विकेट पडली आहे, यामध्ये प्रामुख्याने राजकारणापासून अलिप्त असलेले यांना सुद्धा चालून आलेली संधी निर्माण झाल्याने, प्रस्थापित असणाऱ्या ज्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत, माळशिरस गण सर्वसाधारण झाल्याने, मोठी चुरस निर्माण झाली आहे ,तर बेलसर मध्ये सुद्धा सर्वसाधारण असल्याने, चुरस जास्त प्रमाणात निर्माण झाली आहे. विधानसभेला एकत्र आलेले महायुती सह महाविकास आघाडीतील घटक पक्ष सुद्धा आमने सामने येण्याची दाट शक्यता आहे, ज्या गावात उमेदवारी असेल त्या ठिकाणी बहुद्देश गाव एक होऊन, त्यांना मतदान करीत असतात मग त्या ठिकाणी तू कोणत्या पक्षाचा आहे हे पाहिले जात नाही, असा या गणाचा इतिहास आहे, या गणांमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मतदाराच्या थेट गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे, उमेदवारी अध्याप निश्चित झाली नसताना सुद्धा मतदारांना आपलेसे करण्यासाठी विविध युक्ती या कार्यकर्त्या मार्फत लढविल्या जात आहेत, तर विमानतळ व सासवड रिसेपिसे पर्यंत होणाऱ्या रोडच्या कामामुळे बेलसर गट व बेलसर आणि माळशिरस गणातील लढत ही लक्षवेधी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments