प्रथम वर्ष कला व वाणिज्य वर्गासाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन सासवड प्रतिनिधी: पुणे (दि.1/8 /2025) : वाघिरे महाविद्यालय सासवड येथे प्रथम वर्ष कला व वाणिज्य वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन उत्साहात करण्यात आले.या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख करून देणे, अभ्यासक्रमाची माहिती, महाविद्यालयातील विविध सुविधा, अभ्यासाच्या पद्धती, नियमावली व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या उपक्रमांची माहिती देणे हा होता.कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी महाविद्यालयाच्या इतिहास, शैक्षणिक वातावरण व मूल्यनिष्ठ परंपरांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विविध विभाग प्रमुखांनी आपापल्या विषयांची ओळख करून दिली तसेच करिअर संधींबाबतही मार्गदर्शन केले.विद्यार्थी विकास विभाग, ग्रंथालय, एन.एस.एस., क्रीडा, सांस्कृतिक विभाग, एनसीसी ,परीक्षा विभाग अविष्कार स्पर्धा स्पर्धा परीक्षा केंद्र जिमखाना विभाग शिष्यवृत्ती आधी विभागांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक विद्यार्थी विकास समितीचे प्रमुख प्रा. भुतकर सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व नवीन शैक्षणिक वाटचालीस उत्साही सुरुवात केली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके व उपप्राचार्य डॉ.संजय झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते सदर कार्यक्रमास कला व वाणिज्य विभागातील विद्यार्थी व विभाग प्रमुख सहकारी प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर लिपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.पूनम काळे यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments