Hot Posts

6/recent/ticker-posts

एम.ई.एस इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश ..... सासवड प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सासवड येथील एम.ई.एस इंग्लिश मीडियम स्कूल प्रशालेने सुयश संपादन केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च - प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सात विद्यार्थी पात्र झाले व 50% निकाल लागला आहे. तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता असणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थी पात्र झाले व 67% निकाल लागला आहे. इयत्ता पाचवीचा कु. शिवांश निलेश झेंडे (गुण 230,रँक 313) हा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकला असून तो शासनाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. कु.शिवांशने ही दैदीप्यमान कामगिरी करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला आहे. या विद्यार्थ्यांना मा. मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर यांच्या बरोबरच भाऊसो येळे,स्वाती पांढरे,रुचिरा गार्डी ,निकिता होले प्रतीक्षा बोळगे यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments