Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात: शैलेंद्र बेल्हेकर यांचे मत सासवड प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा अजूनही, मिळत नाहीत. शिक्षणासाठी आजही भर पावसात काळदरी सारख्या भागातील विद्यार्थ्यांना दररोज पायी शाळेसाठी ये- जा करावी लागत आहे. आजही येथील विद्यार्थ्यांना शहरी भागाच्या तुलनेत अनेक शैक्षणिक सुविधा कमी आहेत, परंतु येथील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांची बरोबरी करुन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. म्हणून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून, अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहण्यासाठी मदतीचा हात देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाचे व्यासपीठ निर्माण करावे. असे मत शैलेंद्र बेल्हेकर यांनी व्यक्त केले. हडपसर येथील मांजरी बुद्रुक येथील अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था यांच्या वतीने मुख्याध्यापक विजय चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, काळदरी येथील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार वह्या व पेन देऊन शैक्षणिक मदत केली. विद्यालयाचा सुंदर असा परीसर, बगिचा, विविध सुविधा, स्वच्छता, वृक्षसंवर्धनाचे काम, परसबाग, विविध उपक्रम व विद्यार्थ्यांची शिस्त पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. शहरातील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध असतात, कोचिंग क्लासेस असतात. असे असूनही या सर्व शहरी शाळांपेक्षा ग्रामीण भागातील काळदरी येथील ही शाळा म्हणजे एक आदर्श विद्यार्थी घडवणारे संस्कारकेंद्रच आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी सत्यम बिल्डर्सचे संचालक सुरेश दबडे,साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शशिकला कुंभार, आर एस पी अधिकारी प्रतिभा हरिभक्त, पर्यवेक्षक पांडुरंग दुर्गाडे, प्रा संतोष नवले, सुनिल घोडके, संजय भिंताडे, सुनंदा टकले, कविता शेलार, पांडुरंग जाधव, अशोक भगत, संतोष दोडके आदी उपस्थित होते. याप्रसंगी बाळू पोमणे यांनी सूत्रसंचालन केले तर शिवाजी गोडसे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments