Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांचा लोकहिताचा उपक्रम सासवड प्रतिनिधी:सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी होणारा खर्च टाळून, “समाजाच्या प्रति आपले काहीतरी देणं लागते” या निस्वार्थ भावनेतून सासवड शहरात एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.या उपक्रमांतर्गत, त्यांच्या स्वखर्चातून सासवड शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, प्रशासकीय इमारती, सार्वजनिक मोकळ्या जागा तसेच विविध सोसायट्यांमध्ये गवतावरील तणनाशक औषधाची मोफत फवारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे हा उद्देश ठेवण्यात आला आहे.यापूर्वी, करोना काळात देखील राजेंद्र गिरमे व त्यांच्या मित्रपरिवाराने सलग सात महिने संपूर्ण सासवड शहरात मोफत सॅनिटायझर फवारणी करून नागरिकांचे आरोग्य जपण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला होता. त्या उपक्रमाची दखल सर्व स्तरांतून घेण्यात आली होती.लोकहितासाठी झटणारे आणि आपला वाढदिवस समाजासाठी खर्च करणारे कार्यक्षम सामाजिक कार्यकर्ते म्हणून राजेंद्र गिरमे यांचे पुरंदर तालुक्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. वाढदिवसाचा खर्च टाळून लोकहितासाठी आगळा उपक्रमसासवडचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चातूनसंपूर्ण सासवड शहरातील –शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, प्रशासकीय इमारती, सार्वजनिक जागा व सोसायट्यांमध्ये गवतावरील तणनाशक औषधाची मोफत फवारणी केली.यामुळे शहरातील विद्यार्थी, नागरिक आणि अधिकारी यांचे आरोग्य सुरक्षित राहावे हा त्यांचा उद्देश. कोरोना काळात 7 महिने सलग मोफत सॅनिटायझर फवारणी करून आरोग्य जपणारा हाच माणूस! समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या राजेंद्र गिरमे यांना पुरंदरकरांकडून मनःपूर्वक शुभेच्छा

Post a Comment

0 Comments