Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी शाही जयंती सोहळा णसासवड प्रतिनिधी: साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या 7.5 फुटी प्रतिमेची भव्य रथांमधून मिरवणूक, नवीन प्रशासकीय तहसिल कचेरी येथून ते सासवड नगरपालिका पर्यंत मिरवणुकीसाठी नावाजलेले तिरंगा भव्य ढोल, ताशा पथक सप्तहिंद केसरी वादक, दादा नाना गुणाकर यांचा सनई ताफा, बारामती येथील ढोल बाजा, महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा रांगडी बेळगावची दोस्ती हलगी ग्रुप, मिरवणुकीतून सासवड नगरपालिकेच्या तेथे अण्णाभाऊ साठे यांची105वी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, निवासी नायब तहसिलदार संदीप पाटील, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, गटशिक्षणाधिकारी पुरंदर पंचायत समिती वैभव डुबल, मातंग नवनिर्माण सेनेचे पुरंदरचे प्रमुख अण्णा शेडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, मराठा महासंघाचे पुरंदरचे तालुका अध्यक्ष प्रशांत वांढेकर, सुनील धिवार, शामराव शेडगे, आबा खवले, तालुक्यातील विविध पक्षांचे प्रतिनिधी, सदस्य,पदाधिकारी, पत्रकार बांधव आदी उपस्थित होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून, अभिवादन त्यांना करण्यात आले. लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जीवन व कार्याबाबत मातंग नवनिर्माण सेनेचे प्रमुख अण्णा शेडगे यांनी ही प्रतिनिधीला माहिती दिली.

Post a Comment

0 Comments