पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिकेचा अंधा धुंदी कारभार; पिण्याचे पाणी हे मैला मिश्रित, आरोग्याच्या सुविधा अनाठायी, भरपूर प्रमाणामध्ये फुटलेली गटार योजना यावर भाजप पुरंदर मधील आक्रमक सासवड प्रतिनिधी: सासवड मधील भाजी मंडई या ठिकाणी टॉयलेट स्वच्छ केले की, स्वच्छतेचे पाणी सर्व रोडवर पसरत असून, त्या ठिकाणी डुकरे त्यातच लोळतात, त्यामुळे नागरिकांना त्या घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. कुंभारवाडा या ठिकाणी सुद्धा टॉयलेट चार ते पाच वर्षे झाले बंद आहेत. डुक्कर, गुशी, उंदीर यांनी पूर्णपणे खराब करून टाकले आहे, त्यामुळे घरांना वारंवार दुष्परिणाम दिसून येत आहेत, पद्मावती मंदिराजवळील भागामध्ये सुद्धा मंडईचे ओटे पडलेले आहेत, त्या ठिकाणी घाण आणून टाकली जाते, हे सर्व रस्त्यावर आलेले आहे, डुकर लोळत असतात, परीट आळी या ठिकाणी, नावी आळी मध्ये सुद्धा नागरिकांना खूप त्रास होत आहे, नामदेव मंदिर ते टिनू सोळंकी, जुने दुकान तसेच बागवान आळी मधील ड्रेनेज लाईन ची वेळोवेळी तक्रार सासवड नगरपालिकाला करुण सुद्धा काही उपाय केले जात नाहीत. अण्णा बोर जवळ चेंबर रोड ठिकाणी गाड्या जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे, त्या ठिकाणी गाड्या धडकतात परंतु प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. चांदणी चौकातील एके दुकानासमोरील चेंबर रोडच्या खाली गेला आहे, किती वेळा तरी अपघात होतात, प्रशासनाचे लक्ष नसून, या ठिकाणी भैरवनाथ मंदिर शेजारील आचार्य अत्रे उदयान साफसफाईकडे नगरपालिका किती वर्ष झाले अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे उदयानबंद आहे, लवकरात लवकर चालू करण्यासाठी, उपाययोजना करावी. लांडगे आळी मधील चेंबरच्या चेकअप असल्याने, अनेक जणांच्या घरात घाण पाणी शिरत आहे, भाजी मंडई परिसरामध्ये बागवान आळी या ठिकाणी बँक साईट किती वेळा तरी काही जणांच्या घरामध्ये खराब पाणी शिरत आहे. भाजी मंडई मधील सेकंड फ्लोर या शॉप सेंटर या ठिकाणी जसेच्या तसे आहे, परंतु त्याकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही गोरगरीब महिलांचा प्रपंच त्याच्यावर चालू शकतात, अर्ज करूनही भाडेतत्त्वावर देत नाही, कारण प्रशासन आहे, त्यामुळे प्रशासनाला काही फरक पडत नाही गरीब कुटुंबाचे प्रपंच त्या गाले भाड्याने दिल्यास चांगल्या प्रकारे चालू शकतात, परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बुरुआळी परिसरात खराब पाणी येत आहे, प्रशासन याकडे लक्ष न देता, काही पहात नाही. संध्याकाळची घंटागाडी बंद आहे, न्यायला गाडी येत नाही. जास्त व्यापारी वर्गाला कचरा रस्त्यावर टाकावा लागत आहे, मेन रोड बाजारपेठ त्यासाठी नियोजन करणे गरजेचे असून, नागरिकांना वेळ पडल्यास काही सांगणे गरजेचे आहे आठवडा बाजार, इतर रोडवर भरत असल्यामुळे, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे, तर प्रामुख्याने सासवड नगरपालिकेसमोर तर फळे वाले काही त्या ठिकाणी सहानंतर लावली जातात, त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये अपघात होत आहे, यावर प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही .प्रकाश चौक ते मारुती मंदिर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खूप जुनी असून, भरपूर प्रमाणामध्ये ड्रेनेचेचे मिक्स पाणी होत आहे, संपूर्ण गावठाणा मध्ये पिण्याच्या पाण्याचा वास येत असून, पिण्याच्या पाण्याची लाईन नवीन करण्याची गरज आहे, गावठाण मध्ये एवढे मोठे कुंजीरवाडा आहे, तेथे गावातील गोरगरीब लोकांची लग्न, वाढदिवस, बार्शी, वर्ष श्राद्ध इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम असे केले जात असतात, परंतु संपूर्ण कार्यालय गळत असून, त्या ठिकाणी टॉयलेटमध्ये वरती झाकण सुद्धा नाही, हे पाच वर्षे झाले प्रशासन आहे, पण अजिबात लक्ष नाही, तेथील चेंबर मधून सांडपाणी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी रोडवर येत आहे. याचे नियोजन कशी सासवड नगरपालिका करणार हे अद्याप पर्यंत तरी कळलेले नाही. साळीआळी समाजाची जागा आहे तिथे गवत व इतर राडाराडा साठला आहे, तिथे नगरपालिका स्वच्छतेकडे अजिबात लक्ष देत नाही, यावर प्रशासन काय नक्की काय करत आहे. माईनकर व मेत्रे आळी या ठिकाणी चेंबर दुरुस्तीसाठी सांगितला होता परंतु नगरपालिकेने त्याकडे लक्ष न दिल्याने, त्या ठिकाणी महिलांनी स्वच्छता च्या बाबतीमध्ये स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणची दुरुस्ती केली. कनहैया चौकामध्ये गळंगे, मोरे यांच्या दुकानासमोर पाऊस आला की, चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्याकडे सुद्धा अजिबात लक्ष सासवड नगरपालिका देत नाही. कुमार वढणे लांडगे आळी व घरासमोरील स्वच्छतागृह पाडण्याबाबत मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून, बागवान आळी ते मोठा दुकान सरकारी बोळ खाजगी लोकांनी बंद करून त्या ठिकाणी ताबा घेतला आहे, तो लवकरात लवकर खुला करावा वरील सर्व कोदरेघर ते परीट आळी बंगाळे वाडा या पर्यंत रोड केला जावा, काळुबाई मंदिर ते बायपास हायवे हिवरकर मळा रस्ता मुरमीकरण केला पाहिजे, भुयारी गटार योजना अद्याप पर्यंत चालू नाही, स्मशानभूमी तसेच दहाव्याच्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी ठेवून, स्वच्छता करून घेतली पाहिजे. त्रिशूल सोसायटीमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करून ,डांबरी रस्ता केला पाहिजे, विकास कामे होत असतात परंतु पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन नंतर त्या ठिकाणी रस्ता त्या ठिकाणी असावा, जगताप आणि महेश खंडेराव जगताप यांच्या शेजारील छोटे या ठिकाणी घराजवळील यावेळी भाजपचे शेखर वडणे,साकेत जगताप, आनंद (भैय्या )जगताप, संतोष गिरमे, सागर जगताप ,नंदू जगताप, भाजपचे सासवड शहर मधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेकडोणी सासवड नगरपालिकेमध्ये हजर होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
YouTube channel
Most Popular
FM RADIO 📻
FM Code
FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा
0 Comments