कालउपयोगी शिक्षणामुळे उद्योग व्यवसाय अर्थव्यवस्था आणि देश निर्मितीला हातभार लागणार :डॉ .उदय निरगुडकर सासवड प्रतिनिधी: एस. एन. डी. टी महिला विद्यापीठातर्फे आयोजित ' संस्कृता 'व्याख्यानमाला अंतर्गत एस.एन.डी.टी होम सायन्स महाविद्यालयातर्फे आयोजित 'संस्कृता ते राष्ट्रनिर्माता ,विद्यार्थिनींची विकसित भारताच्या निर्मितीतील भूमिका 'या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते डॉ. उदय निरगुडकर यांनी विद्यार्थिनींची विकसित भारताच्या निर्मितीतील भूमिका मांडताना प्रतिपादन केले की , परिस्थिती व काळा अनुसरून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पुरवले तर राष्ट्रनिर्मिती मध्ये सहभाग वाढणार आहे.1916 रोजी एस.एन.डी.टी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर महिलांच्या शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल होण्यास सुरुवात झाली. डॉ. निरगुडकर यांच्या मातोश्री 1946 ते 1948 यादरम्यान एस.एन.डी.टी विद्यापीठामध्ये, प्रत्यक्ष भारतरत्न डॉ. धोंडो केशव कर्वे यांचे मार्गदर्शन मिळण्याचे भाग्य मिळाले. त्यांच्या मातोश्री या आदर्श शिक्षिका ही होत्या. खऱ्या अर्थाने अशा अनेक माता संस्कृता व राष्ट्र निर्मितीत सहभाग घेणाऱ्या अनेक संस्कृता एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या माध्यमातून घडल्या आहेत , याबद्दल डॉ.निरगुडकर यांनी संस्थेचे आभार मानले.एखाद्या राष्ट्राची निर्मिती ही त्या राष्ट्रांमधील मानवी संपदेची गुणवत्ता, त्या राष्ट्रांमधील सामाजिक सांस्कृतिक वातावरण, व लोकांचा राष्ट्रनिर्मितीमधील सहभाग यावर अवलंबून असते हे विषद करताना डॉ. निरगुडकर यांनी,प्रत्येकाने स्वतःच्या रोजच्या सवयींमध्ये शिस्तबद्धता आणली, व राष्ट्रनिर्मिती सारख्या उच्च ध्येयासाठी आपल्याला जमेल त्याप्रमाणे सहभाग नोंदवला तर विकसित भारताचे स्वप्न साकारताना, आपल्या भारत देश अनेक बाबतीमध्ये पूर्ण जगाला दिशा देणारी शक्ती बनू शकते . शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षण देण्याला महत्त्व देण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी शिक्षण आत्मसात केले पाहिजे या प्रक्रियेवर भर दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. प्रेरणादायी अनेक व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देताना त्यांनी,जीवनशैली मधील शिस्तबद्धता खूप महत्त्वाची असते असे सांगितले. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक करताना व्याख्यानमालेचे आयोजक,व डॉ.गणेश चव्हाणसर ,प्राचार्य एस.एन.डी.टी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे,यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. 2047 विकसित भारत, या उद्दिष्ट पूर्तीसाठी अशा व्याख्यानमालांच्या आयोजनाचे महत्त्व त्यांनी विषद केले.कार्यक्रमाचे आभार मानताना, सिनेट सदस्य डॉ.महेश कोलतामे यांनी, डॉ.उदय निरगुडकर यांचे आभार मानले. व डॉ. उदय निरगुडकर यांनी विषयाची मांडणी करताना , गाव कोसा पासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत, विविध प्रेरणादायी घटनांची माहिती सांगितली व विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले , याबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवी पाटणकर यांनी केले. भगवद्गीतेचा दाखला देताना त्यांनी महिलांमधील सप्त गुणांची , व विविध स्त्री शक्ती रोपांची ओळख करून दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments