सासवड येथे तहसील कार्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा महसूल मधील सर्व घटकातील चांगले काम कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या सासवड येथील तहसील कार्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार विक्रम राजापूत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला... यावेळी गेल्या वर्षे भरत उत्कृष्ठ काम करणारे महसूल कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल व शिपाई यांचा सन्मान करण्यात आला... शुक्रवारी सायंकाळी नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी निवासी बा तहसिलदार,संदिप पाटील,महसूल मा. तहसिलदार सोनाली वाघ,निवडणूक ना तहसिलदार शुभांगी गोजारे, संजय गांधी निराधार योजना तहसिलदार महादेव जाधव,पुरवठा नायब तहसिलदार गोपाळ ठाकरे, महसूल कर्मचारी विविध गावचे पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वर्षभरात केलेल्या चांगल्या कामाबद्दल , पुरवठा नायब तहसिलदार गोपाळ ठाकरे,मंडल अधिकारी सासवड सुहास कांबळे,ग्राम महसूल अधिकारी सतिश मोकाशी,पोलिस पाटील मोहन इंगळे,कोतवाल संतोष जाधव, शिपाई कुदळे मॅडम,निवृत्ती नायब तहसिलदार सुरेश वीर,राजेंद्र राऊत,जी वन टिळेकर, पवन दुधाळ यांना सन्माणीत करण्यात आले. यावेळी तहसिलदार विक्रम राजपूत यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आपल्याला सध्या महसूलच्या मुख्य कामाव्यतिरिक्त इतर कामांवर जास्त लक्ष द्यावे लागते.त्यामुळे आपलं काम मागं पडतं आणि त्यामुळे आपल्याला लोकांच्या रोशाला समोर जावे लागते. मात्र यापुढे असे न करता आपल मुख्य काम पूर्ण करण्यावर भर द्या.असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या कामांचे नियोजन करा आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना दिवसभरात करायचा कामांचे नियोजन करा. ज्या गावात आपण काम करत असेल त्या गावातल्या लोकांना आपण कधी येणार कधी जाणार याबाबतची माहिती असायला हवी. अस असेल तर लोकांची कामं वेळेत पूर्ण होतील. लोकांचे कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी भर द्या. असा सूचना त्यांनी या वेळी दिल्या..
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments