पुरंदर तालुक्यात नारायणपूरच्या कन्यांचा डंका सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या वतीने दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सासवड येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगल्या. या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नारायणपूर येथील राजगड ज्ञानपीठ भोर संचलित,सद्गुरु श्री नारायण महाराज माध्यमिक विद्यालयाने सद्गुरु श्री अण्णा महाराजांच्या आशीर्वादाने पुरंदर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून इतिहास रचला. पुरंदर हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य सय्यद इस्माईल , पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद कारकर,क्रीडा शिक्षक बाळासाहेब झेंडे यांनी फायनल मॅच संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यालयातील मुलींनी उत्कृष्ट खेळ सादर करून राजगड ज्ञानपीठाचा गौरव वाढविला.त्यांच्या या यशामध्ये मार्गदर्शक मुख्याध्यापक राम चौगुले, भगवान घोळवेसर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान राहिले.या विजयामुळे विद्यालयाचे नाव संपूर्ण तालुक्यात उज्ज्वल झाले असून शालेय परिवार, पालक, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांकडून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजगड ज्ञानपीठ,भोर संस्थेचे अध्यक्ष, मा.आमदार संग्राम थोपटे,उपाध्यक्ष पृथ्वीराजभैय्या थोपटे, सचिवा स्वरूपाताई थोपटे व संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी रामचंद्र थोपटे यांनी खेळाडूंना आशीर्वाद देत पुढील पातळीवरही उत्तुंग कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. नारायणपूर,पेठ,पोखर व चिव्हेवाडी पंचक्रोशीतील मान्यवर भरतनाना क्षीरसागर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदाशिव बोरकर,सरपंच प्रदीपबापू बोरकर, सामाजिक कार्यकर्ते रामतात्या बोरकर मा.सरपंच चंद्रकांत बोरकर, सोपान आबा बोरकर व समस्त ग्रामस्थांनी यांनी मुलींच्या या यशाचा मनापासून गौरव केला आहे. टेंभे स्वामी यांनी मुलींना भरभरुन आशीर्वाद दिले. नारायणपूरच्या कन्यांनी दाखवून दिले की, जिद्द, मेहनत व एकजुटीच्या जोरावर कोणतेही शिखर गाठता येते. बातमी सोबत फोटो पाठवीत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
YouTube channel
Most Popular
FM RADIO 📻
FM Code
FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा
0 Comments