आईच्या स्मरणार्थ सामाजिक संस्थांना देणगी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाघापूर (ता. पुरंदर) गावचे सुपुत्र ,शिक्षक नेते, समर्थ नाना टूर्स अँड ट्रॅव्हल्स संस्थापक अध्यक्ष ,उद्योजक प्रदीप हनुमंत कुंजीर यांच्या मातोश्री व आदर्श शिक्षिका जयश्री प्रदीप कुंजीर- बोबडे यांच्या सासुबाई श्रीम.चंद्रभागा हनुमंत कुंजीर यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या स्मृती स्मरणार्थ त्यांनी ममता बालसदन कुंभारवळण आश्रम येथील मुलांना भोजनासाठी १० हजार रुपये, जीवनवर्धिनी मतिमंद विद्यालय दिवे येथील मुलांसाठी गणवेश घेण्यासाठी १५ हजार रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघापूर १० हजार रुपये, आपुलकी फाउंडेशन वाघापूर ला वृक्ष लागवड ,आरोग्य, स्वच्छता साठी २१ हजार रुपये चे धनादेश दिले. धनादेश वितरण प्रसंगी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत रावसाहेब पवार, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक टिळेकर, कैलास चोरगे, शिक्षक नेते प्रदीप कुंजीर ,आदर्श शिक्षक शरद बोबडे उपस्थित होते. आपल्या मातोश्री यांनी आयुष्यभर सुसंस्कार करून आम्हाला घडवले. आमचे वडील स्वर्गीय हनुमंत कुंजीर व आई चंद्रभागा कुंजीर यांनी आयुष्यभर कष्ट करत समाजासाठी खूप मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या सेवेचा वसा व वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सामाजिक संस्थांना देणगी स्वरूपात मदत केल्याचे शिक्षकनेते प्रदीप कुंजर यांनी सांगितले. आपल्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ सामाजिक संस्थांना देणगी देणारे शिक्षक नेते प्रदीप कुंजीर हे खऱ्या अर्थाने सामाजिक जाणीव जागृतीचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांची ही कृती निश्चितच प्रेरणादायी आहे.बातमी सोबत फोटो पाठवीत आहे. फोटो ओळी- दिवे (ता. पुरंदर) येथे आईच्या स्मरणार्थ जीवन वर्धिनी मतिमंद विद्यालयाला देणगीचा धनादेश बाळासाहेब झेंडे यांना देताना रावसाहेब पवार, अशोक टिळेकर कैलास चोरगे व प्रदीप कुंजीर
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments