Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला प्रचंड वेग; तर 72 टक्के क्षेत्रासाठी समंतीपत्रे सादर 2030 एकर जागा ताब्यामध्ये सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी जमीन देण्यास शेतकरी स्वतःहून पुढे येत आहेत, मागील 18 दिवसात विमानतळ होणाऱ्या सात गावांमधील 1 हजार 980 शेतकऱ्यांनी सुमारे 2030 एकर क्षेत्रासाठी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दिली आहेत, एकूण क्षेत्राचा विचार करता तब्बल 72% क्षेत्राची संमती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभार वळण, एखतपुर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे, पूर्वी या सात गावातून सुमारे सात हजार एकर भूसंपादन करण्यात येणार होते. त्यामध्ये कपात करून, राज्य शासनाकडून 3000 एकर भूसंपादन करण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी 25 ऑगस्ट ला समतीपत्रे स्वीकारण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात झाली, पहिल्याच दिवशी तब्बल 760 शेतकऱ्यांनी सुमारे 1 हजार 70 एकर क्षेत्रासाठी संमतीपत्रे दिली. दिवशे दिवस यामध्ये वाढ होत, आत्तापर्यंत 2030 एकर म्हणजे 72% जमिनीची भूसंपादनाची समतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे आली आहेत, ज्या नागरिकांनी भूसंपादनासाठी संमती पत्रे सादर केली आहेत, त्या जागा मालकांचा परतावा निश्चित झाला आहे, विमानतळासाठी संमती देण्यासाठी 18 सप्टेंबर पर्यंत मुदत असल्याचे, जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे, पुरंदर विमानतळ एकूण संपादन क्षेत्र सुमारे 3000 एकर, समतीपत्रे दिलेली शेत्र सुमारे 2030 एकर.

Post a Comment

0 Comments