पुरंदर तालुक्यातील तोंडल येथील शेडगे वस्ती जवळील वीर सारोळा रोडवरील ऊसतोड कामगारांचा अज्ञात वाहकाकडून अपघात होऊन चार जण मृत्यूमुखी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: तोंडल ता. पुरंदर येथील शेडगे वस्ती जवळील वीर सारोळा रोड वरील ऊसतोड कामगारांचा अपघात झाला आहे, असा फोन आला असता, दिनेश प्रकाश निगडे हे अपघात ठिकाणी गेले असता, त्यांना अपघात स्थळी चार इसम हे रोडवरती जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले, नंतर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची संपर्क केला असता, पोलीस पोहोचल्यानंतर चार इसम हे निगडे प्रकाश याना स्वतःच्या शेतातील ऊस तोडणारे कामगार माझ्या ओळखीचे असलेले, हरी शिवराम बर्डे, प्रदीप वसंत भोई, अमित सनिश चौधरी, मुरलीभाई सोन्याभाई महाला हे असल्याचे खात्री झाल्यानंतर, त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला बजाज प्लेटिना कंपनीची मोटरसायकल नंबर gj 21r 1327 असा गाडी नंबर दिसून आला, त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना विचारले असता, सदर हा अपघात अज्ञात वाहन हे सारोळा ते वीर रोडने वीर बाजूकडे जात असताना, समोरून येणाऱ्या मोटारसायकलला समोरून धडक देऊन, हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले, त्यावेळी ॲम्बुलन्स येऊन उपचार कामी सासवड ग्रामीण रुग्णालयात सासवडच्या ठिकाणी घेऊन गेलो असता, तेथील डॉक्टरने चारही इसम यांना तपासले असता, ते उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगण्यात आले, दि. 2 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता तोंडल ता. पुरंदर येथील या ठिकाणी अज्ञात इसमाने त्यांच्या ताब्यातील वाहन रस्त्याने, परिस्थितीचा व तीव्र वलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच, एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत होईल, असा भरधाव वेगात गाडी चालवून चार इसमाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून, अपघाताची कोणतीही खबर न देता, निघून गेले आहेत, म्हणून अज्ञात वाहनावरील अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा फिर्यादी दिनेश प्रकाश निगडे यांनी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला आहे. हा गुन्हा पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे यांनी दाखल करून घेतलेला आहे, गु.र. नं. 41/ 2026 कलम 105, 106, 125 (a)( b) 324 (4) मोटार वाहन कलम 184 ,134/ 177 गुन्हा दाखल केला आहे, तरी सर्व मयतांचे पीएम करून, मयतांच्या बॉडी ह्या त्यांच्या मूळ गावी गुजरात येथे आज दि.3 फेब्रुवारी दोघीच्या पहाटे चार वाजता रवाना केलेल्या आहेत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसल्याने, सीसीटीव्ही आणि आजूबाजूच्या लोकांच्याकडे तपास करून, अपघात करणाऱ्या वाहनांचा शोध घेण्याचे काम सध्या चालू आहे, असे सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपासी अधिकारी म्हणून वैभव सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments