Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विद्यालय याच्या सासवड सेवा केंद्राच्या वतीने, महाशिवरात्रीच्या निमित्त पावन झालेल्या परवा निमित्त सासवड येथे विशेष असे तीन दिवसीय प्रेरणादायी असणारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम दिनांक 14, 15 व 16 फेब्रुवारी 2026 रोजी पालखी मैदान सासवड येथे होणार असून, सायंकाळी विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत, ब्रह्मकुमारी संस्था गेल्या 30 वर्षापासून सासवड परिसरात सातत्याने सामाजिक व आध्यात्मिक सेवा कार्य करत असून, सध्या ही संस्था जगातील १४० हून, अधिक देशांमध्ये कार्यरत आहे, ध्यान, योग, व्यसनमुक्ती, नैतिक मूल्य संवर्धन, सकारात्मक जीवनशैली याबाबत जन जागृती, करण्यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात, या तीन दिवसीय कार्यक्रमांमध्ये शिवशक्ती अवतार, या विषयावर आधारित चैतन्य झाकी शाश्वत योगी शेती, तसेच गोकुळ गाव संकल्पनेचे सादरीकरण करण्यात येणार आहे, रसायनमुक्त व शाश्वत शेती मातीची सुपीकता वाढविणे, अध्यात्मिक पद्धतीने शेती व जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, तसेच समाजात सद्भावना व मूल्य संवर्धन घडविणे, हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, कार्यक्रमाच्या दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता महाआरती आयोजित करण्यात आली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सासवड सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मा कुमारी नीलिमा दीदी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments