Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथे परप्रांतीयांचा अकस्मात असा मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील एका 45 वर्षीय व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाला असून, ही घटना घडलेली आहे .छोटू शर्मा राहणार जिल्हा उत्तर धीनाजपूर पश्चिम बंगाल असे मृताचे नाव असून, सासवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मात अशी मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे, मिळालेल्या माहितीनुसार 23 फेब्रुवारीला सिंगापूर येथील सुरेश गायकवाड यांच्या शेतात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस पाटील यादवेंद्र उरसळ यांना मिळाली त्यांनी तातडीने सासवड पोलिसांना नापासारण केले असता ,पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला सासवड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले, मात्र उपचारा पूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते ,हॉटेल मालिक राजेंद्र मुळजे यांनी या घटनेची प्राथमिक माहिती दिली होती, सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रेय शेगर आणि सुनील चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments