Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील चिवहेवाडी घाटामध्ये भीषण वनवा वनसंपदेसह वन जीव्यांना फटका सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ञ पुरंदर तालुक्यातील चिवहेवाडी घाटांमधील मंगळवारी दिनांक 24 रोजी दुपारच्या एकच्या सुमारास भीषण वनवा लागला होता ,या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर वनातील वाढलेले गवत जळून खाक झाले असून, सरपटणारे प्राणी व पक्ष्यांच्या अधिवासाला मोठी जळ बसलेली आहे ,वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक मजुरांच्या मदतीने शर्तीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली असून ,सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील चिवहेवाडी घाटामध्ये वाळलेले गवत आणि वाढत्या उष्णतेमुळे आग वेगाने पसरली होती ,रस्त्याने प्रवास करणाऱ्यांनी टाकलेल्या जळत्या बिडी काडीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे ,या परिसरात ससे, तरस ,लांडगे ,मोर आणि विविध सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य आहे ,आगीमुळे या जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश पवार ,वनरक्षक योगेश नजन, अक्षय लव्हाळे व वनमजुरांनी आग आटोक्यात आणण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments