Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्राहक हक्क संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष महेश राऊत यांनी जाणीवपूर्वक सासवड व जेजुरी येथील डॉक्टर, प्रशासकीय महिला अधिकारी ,पत्रकार यांची बदनामी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथे डॉक्टर शिवतारे यांना सुपा गावातील जुन्या वादावरून व हॉस्पिटलच्या नाहा हरकतीच्या कारणावरून गेली चार ते पाच वर्ष जाणीवपूर्वक बदनामी करून, गेल्या आठवड्यामध्ये डॉक्टर घरी सुप्यात जात असताना, महेश मारुती राऊत यांनी व त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी डॉक्टर शिवतारे यांना मारहाण केली होती, ग्रामीण रुग्णालयात सुद्धा उपचाराला गेले असता, डॉक्टर यांना नेले असतात त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टरांना त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली होती ,त्या पार्श्वभूमीवर त्या राऊत विरुद्ध सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता, त्या संदर्भात गुन्हा रजिस्टर नोंद असताना सर्व वर्तमानपत्रांमध्ये बातमी छापून आली असता ,पत्रकार, प्रशासकीय महिला अधिकारी, पुरंदर मधील सर्व स्तरावरील डॉक्टर अशा वेगवेगळ्या स्तरावरील सामान्य नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना खंडीणी मागणी, दुसऱ्याला त्रास देणे, हे प्रकार या व्यक्तीकडून घडलेली आहेत सध्या तरी हा आरोपी व साथीदार फरार असून, राऊत विरुद्ध गुन्हा सासवड पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे, तरी पुरंदर मेडिकल असोसिएशन ,पत्रकार प्रशासकीय महिला अधिकारी, डॉक्टर यांनी पुन्हा तक्रारी अर्ज सासवड पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे. खोट्या, खोडसाळपणामुळे करत डॉक्टर यांना जाणीवपूर्वक आर्थिक व मानसिक त्रास देण्यासाठी वेळोवेळी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी सर्व स्तरावर हा खंडणी मागत होता, खोट्या तक्रारी देऊन समाज माध्यमावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करत होता ,तर 18 फेब्रुवारी रोजी डॉक्टर सुभाष दत्तात्रय शिवतारे यांना तर स्वत: व साथीदारांनी रस्त्यावरती अडवून त्यांचे मित्र यांनी संगणमत करून बेकायदेशीर जमाव जमून मारहाण करून समाज माध्यमावर बदनामी करण्याची धमकी दिल्याबद्दल त्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यासाठी या प्रकरणाची चौकशी करून महेश मारुती राऊत यांच्याविरुद्ध योग्य ती अशी कारवाई करावी अशी निवेदन हे प्रामुख्याने पुरंदर मेडिकल असोसिएशन सासवड याकडून डॉक्टर प्रवीण जगताप, डॉक्टर सचिन निरगुडे ,डॉक्टर उमाकांत ढवळे, डॉक्टर सुमित काकडे, डॉक्टर अनिल कदम, डॉक्टर राजेश दळवी, डॉक्टर सुभाष शिवतारे, डॉक्टर संदीप होले ,पत्रकार, प्रशासकीय महिला अधिकारी पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशनला आरोपी महेश मारुती राऊत यांच्याविरुद्ध तक्रारी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यावर खंडणी मागणी, पत्रकार, महिला अधिकारी पुरंदर मधील व डॉक्टर यांना त्रास देणे याबद्दल राऊत व त्यांच्या साथीदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी पुरंदर मधून होत आहे.

Post a Comment

0 Comments