एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड येथे विज्ञान व कला प्रदर्शन उत्साहात संपन्न..... सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. किरण रणदिवे व नीता जगताप-रणदिवे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पर्यवेक्षिका सरोज जांगडा यांनी केलेल्या प्रभावी प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर स्वाती पांढरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालनाची धुरा निकिता होले यांनी समर्थपणे सांभाळली.या विज्ञान प्रदर्शनात नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने व मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विज्ञान व कला प्रदर्शन, विविध वैज्ञानिक प्रयोग, भाषणे आणि आकर्षक मॉडेल्स सादर केली. पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत, पाणी व्यवस्थापन, अवकाश विज्ञान यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी कल्पकतेने प्रकल्प मांडले. कला व सर्वच शैक्षणिक विषयांवर आधारित विविध उपक्रम विद्यार्थ्यांनी तयार केले होते तसेच पालकांनी तयार केलेले प्रकल्प व शैक्षणिक साधने आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विज्ञानाची आवड जोपासण्याचे व संशोधन वृत्ती विकसित करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही.रामन यांच्या कार्याचा उल्लेख करून विज्ञान क्षेत्रातील प्रेरणादायी योगदानाबद्दल माहिती दिली, मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर - नागनूर यांनी आपल्या मुख्याध्यापकीय मनोगतात विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून दिले.अश्विनी खळदकर यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम विज्ञानमय आणि प्रेरणादायी वातावरणात उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सांगता प्रमुख पाहुण्यांनी सादर केलेल्या सुश्राव्य पसायदानाने झाली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments