Hot Posts

6/recent/ticker-posts

बाल विकास मंदिर शाळेत विज्ञान प्रदर्शन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन आणि चित्रकला, हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी, शाळेचे माजी विद्यार्थी देवेंद्र तपस्वी, पालक प्रतिनिधी बापू मुळीक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी हवा, पाणी, आहार , शेतीच्या आधुनिक पद्धती, ज्वालामुखी, जलचक्र अशा विविध विषयांवर आधारित ५० प्रकल्प यावेळी सादर केले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा या प्रदर्शनामागाचा उद्देश होता. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर बनवलेल्या वस्तूंचे, चित्रांचे यावेळी प्रदर्शन भरवण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ अशा सुंदर वस्तू बनवलेल्या होत्या. या विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षिका राजगौरी जगताप यांनी मागदर्शन केले होते. या प्रदर्शनाला शाळेचे माजी विद्यार्थी, पालक यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रदर्शनाचे नियोजन मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुषा चोरामले, शारदा यादव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Post a Comment

0 Comments