पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर रस्त्यावर झालेल्या नाश्ता हात गाड्यांच्या मुळे होणारे अतिक्रमण हे धोकादायक बनलेले सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड शहरात जिजामाता उदयांना समोर फळे भाजीपाला विक्री गेली सुमारे 25 ते 30 वर्षापासून उदयानाच्या भिंती लगत नगरपालिकेच्या नियोजन जागेत बसून व्यवसाय असा करीत आहेत गेली आठ ते नऊ महिन्यापासून व्यवसायाचे दुकानं समोर ठीक ठिकाणी नाष्टा, पाणीपुरी, आईस्क्रीम, कच्ची दाबेली, शेव पावभाजी, ॲपल ज्यूस अशा विविध प्रकारच्या खाऊच्या हात गाड्या ही विक्रेते परंप्रातीय व सासवड शहराबाहेरील विक्रेते आहेत, तसेच नगरपालिकेच्या पीडब्ल्यूडी च्या जागेत अतिक्रमणे करून दुसऱ्या लोकांना जागा भाड्याने देत असतात, सध्या ही परिस्थिती अशी असताना जिजामाता फळेबाजी विक्री, मार्केट समोरच्या हातगाड्यावाल्यांनी मार्केटचा रस्ता काढून, दादागिरीने आपला व्यवसाय मांडलेला आहे, हे हात गाडीवाले व्यवसाय करीत असताना त्यांचा गिराईक हे दोन चाकी चार चाकी वाहन घेऊन रस्त्यावर उभे राहून नाष्टा करत असतात व पार्सल घेऊन जातात त्यावेळी फळे भाजीपाला घेऊन येणारा मालवाहतूक वाहन हे लावण्यास किंवा भाजीपाला फळे घेण्यासाठी आणण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला जागा नसते तसे कोणी ग्राहक जर वाहन किंवा गाडी बाजूला घे असे जर सांगत असेल तर त्या ग्राहकालाही हातगाडी व्यवसायिक दादागिरी भांडणे हाणामाऱ्या करत असतात, या ठिकाणी फळे भाजीपाला विक्रेते व हात गाडीवाले यांना जर सांगायला गेलं असता, त्या ठिकाणी तयाबरोबर देखील भांडणे करत असतात, सर्व फळे भाजीपाला विक्री संघटनेने मार्केटने वेळोवेळी सासवड नगरपालिकेत लेखी अर्जाद्वारे सुमारे 14 ते 15 वेळा कळविलेले असताना देखील सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी , आरोग्य अधिकारी, पीडब्ल्यूडी चे रस्ता विभागीय अधिकारी हे काही आत्तापर्यंत कारवाई करीत नाहीत, सदर नाष्टा हातगाडी अतिक्रमण व्यवसायामुळे पुणे पंढरपूर ,सासवड नारायणपूर, वीर, बालाजी कानिफनाथ, सोपान देव ,जेजुरी, मल्हारगड या विविध तीर्थक्षेत्रिय देवस्थानाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जात येत असतात, सकाळी पुरंदर तालुक्याच्या शेतीमाल घेऊन जाणारे शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात सासवडला येत असतो, त्या अनुषंगाने या रस्त्यावर वाहतूक जास्त असते, या नाष्ट्या हातगाड्यामुळे वाहतूक कोंडी वेळोवेळी होत असते, या रस्त्यालगत वाघिरे महाविद्यालय, शिवाजी मिडीयम न्यू इंग्लिश स्कूल, वाघिरे विद्यालय, आंबेडकर उद्यान ,जिजामाता उद्यान ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, आचार्य अत्रे भवन नगरपालिका अशी शासकीय कार्यालय असून, ह्या रस्त्यावर अंगणवाडीत जाणारे लहान विद्यार्थी पालक, सायकलवर जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनींचे जेष्ठ किंवा महिला पालक हे आपल्या बाईकवर मुलांना शाळेत सोडण्याकरता जात असतात, तसेच जेष्ठ नागरिक हे बागेत फिरण्यासाठी येत असतात, त्या हातगाडी वाले यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून, वाहतुकीस अडथळा निर्माण करून सदरील विद्यार्थी, पालक, महिला, जेष्ठ नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत, तरी या ठिकाणी यांच्या या प्रकारामुळे रोज किंवा दिवसाड सारखे अपघात हे होत असतात, यावर नक्की कारवाई ही होणार का? अजून नगरपरिषद यासाठी अपघाताची मालिका पाहण्यासाठी नगरपरिषद वाट पाहत आहे ,अशीच एक प्रकारे शंका सामान्य नागरिकांना पडलेली आहे, यासंदर्भात पुरंदरचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी ,पोलीस अधीक्षक सासवड पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर उपविभाग, जिल्हाधिकारी पुणे त्यांना निवेदन ही उमेश राऊत, राजेंद्र होले, हरून बागवान ,उमेद बागवान, संभाजी लवांडे, सुवर्णा होले, मालन पवार ,कल्पना काळे ,बुद्धिवंत गणेश, सुनिता होले, साहिल बागवान, मनोज होले, आप्पा भांडवलकर, प्रशांत टिळेकर, कलाबाई पवार, लिलाबाई धोत्रे ,जाधव समीक्षा आदी फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते त्यांनी हे निवेदन सादर केले आहे तरी कारवाई या नाष्टे वाल्यांच्या वर कधी करणार आत्तापर्यंत नऊ ते दहा महिन्यात कारवाई केली नाही, तर फक्त अपघाताची मालिका व भांडणे होतानाच ही नगरपरिषद पाहणार आहे का? असा प्रश्न हा सामान्य नागरिकांना पडलेला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments