Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी 28 दुचाकी स्वारावर कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: रस्त्यावरून जात असताना सायलेन्सरचा मोठा आवाज काढून नागरिकांना त्रास देणाऱ्या 28 दुचाकी स्वरावर सासवड पोलिसांनी कारवाई केली असून, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये आरटीओ मार्फत या वाहनांना एकूण तीन लाख रुपयांचा दंड थोतावण्यात आला आहे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती, यावेळी सायलेन्सर मध्ये बदल करून कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट ,स्प्लेंडर, पल्सर सह 28 वाहनावर कारवाई करण्यात आली, या जप्त वाहनांची बुधवारी दिनांक 25 रोजी आरटीओ कोकडून आजच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून दंड आकारला विशेष म्हणजे जप्त केलेल्या गाड्यांमध्ये सहा वर्षांपूर्वी बारामतीतून चोरीला गेलेली एक बुलेटही पोलिसांना सापडली असून, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे व पथकाने ही कारवाई केली आहे ,विशिष्ट दुचाकी स्वरावरील या धडक कारवाईमुळे सासवडकरांनी एक प्रकारे समाधान व्यक्त केलेले आहे.

Post a Comment

0 Comments