Hot Posts

6/recent/ticker-posts

एम. ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न..... सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात व दिमाखात पार पडली. स्पर्धेस तालुक्यातील एकूण १५ शाळांमधील ४५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्व प्रतिभा मायभाटे मॅडम, स्नेहल देशपांडे मॅडम, स्वाती कटके मॅडम आणि मेघा अद्वैत मॅडम उपस्थित होत्या. वरील मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या कथनशैली, आवाजातील चढ-उतार, विषय निवड, आत्मविश्वास व सादरीकरण या विषयी मार्गदर्शन केले. व स्पर्धांचे बारकाईने परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी वीर बाल साहस कथा, कथा गुरू - शिष्यांच्या, संस्कारक्षम बोधकथा तसेच प्रेरणादायी विषयांवरील कथा प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.सुरुवातीस पर्यवेक्षिका सरोज जांगडा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर - नागनूर यांनी मराठी दिनाचे महत्त्व पटवून दिले. गीता पुरंदरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :-*छोटा गट -( इयत्ता ३ री ते ५ वी )-* प्रथम - श्री गणेश राऊत - शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल,सासवड.द्वितीय - प्राप्ती संतोष कुंभारकर - सेंट जोसेफ स्कूल, खळद.तृतीय - अहान हेमंतकुमार बुधे - सेंट जोसेफ स्कूल, खळद.उत्तेजनार्थ - श्रेयस सचिन वाघोले - म.ए.सो.बालविकास मंदिर सासवड.उत्तेजनार्थ - वेदिका निलेश खळदकर - जिल्हा परिषद प्राथ.शाळा कुंभारवळण उत्तेजनार्थ - स्वराज्ञा आनंदराज हिंगणे - सेंट जोसेफ स्कूल, खळद.*मोठा गट -( इयत्ता ६ री ते ८ वी )*प्रथम - राजवर्धन सागर जगताप - शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल,सासवड.द्वितीय - अनुप्रिया जयदीप पांडकर - म.ए.सो.वाघीरे विद्यालय, सासवड.तृतीय - रितिका नवनाथ शिंदे - सेंट जोसेफ स्कूल, खळद.उत्तेजनार्थ - साहिल विकास जगताप - यशवंत विद्यालय मावडी क. प. भागशाळा पांडेश्वर उत्तेजनार्थ - सिद्धी संदीप पवार - संत नामदेव शाळा, सासवड.स्पर्धेचे सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख श्री. भाऊसाहेब येळे यांनी प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी रुचिरा गार्डी यांनी उपस्थितांचे आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने स्पर्धा उत्तमरित्या पार पडली.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याला व कल्पनाशक्तीला उत्तम वाव मिळाला असून उपस्थित पालक व शिक्षकांनी कौतुकास्पद अभिप्राय दिले.

Post a Comment

0 Comments