पुरंदर तालुक्यातील नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा पत्रकारांकडून सन्मान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: येत्या ३१ मार्च पर्यंत मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविण्यात येत असून स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांमधे सुधारणा होण्यासाठी नव्याने निवडूनआलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांनीसहभाग नोंदवत अभियान यशस्वी करावे असे आवाहन पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी केले आहे. सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ता दुर्गाडे, रुपाली झेंडे, हरिभाऊ लोळे व अजय इंगळे तसेच अमित झेंडे, माणिक निंबाळकर, अर्चना कटके, माऊली यादव, सायली शिंदे, स्मिता निगडे, मोनिका कांबळे या पंचायत समितीच्या सदस्यांचा शाल , गुलाबपुष्प व संत सोपानदेव यांची प्रतिमा देऊन पत्रकार बंधूंनी सत्कार केला. उपस्थित सर्व सदस्यांनी आपल्या मनोगतात पक्ष, गटतट बाजूला ठेवून पुरंदरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करू अशी भावना व्यक्त केली. पत्रकारांनी चुकीच्या बाबी लक्षात आणाव्यात व चांगल्या गोष्टींना प्रसिध्दी द्यावी असेही आवाहन सर्वांनी केले. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रोहित अभंग यांनीही यावेळी कार्यक्रमास मनोगत मांडून शुभेच्छा दिल्या. पत्रकार संभाजी महामुनी यांनी प्रास्ताविक तर सुधीर गुरव यांनी आभार मानले. संघाचे अध्यक्ष हेमंत ताकवले यांनी सूत्र संचालन केले. कार्यक्रमास शशांक सावंत, संतोष निगडे , डॉ मनोज शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.गणेश मुळीक, जीवन कड, बाळासाहेब कुलकर्णी, राजेंद्र बर्गे, जगदीश शिंदे, संदीप जगताप, सुनील वढणे या पत्रकार संघाच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले .
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments