Hot Posts

6/recent/ticker-posts

संतोष जगताप यांची भाजपा एनजीओ आघाडी जिल्हा संयोजकपदी नियुक्ती; पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्याला नवे बळ सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्ह्यातील युवा व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते संतोष जगताप यांची भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण या कार्यकारणी मध्ये एनजीओ आघाडीच्या जिल्हा संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश जगताप, सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप, साकेत जगताप, भानुकाका जगताप, माधव शिवरकर, सचिन पठारे उपस्थित होते.संतोष जगताप हे सासवड येथील स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून गेले १७ वर्ष सातत्याने ते शैक्षणिक आणि समाजकार्यात सक्रिय आहेत. ग्रामीण व शहरी भागातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सायकल वाटप, फिरती सायन्स लॅब, संगणक संचाचे वाटप,आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहिम, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, युवकांना मार्गदर्शन शिबिरे तसेच आपत्तीग्रस्तांना मदत अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.कोरोना काळातही त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्नधान्य वाटप, औषधोपचार सहाय्य व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या सातत्यपूर्ण, निस्वार्थी आणि लोकाभिमुख कार्याची दखल घेत भाजपाकडून त्यांच्यावर पुणे जिल्हाग्रामीण एनजीओ आघाडीच्या जिल्हा संयोजक पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना संतोष जगताप म्हणाले, “आजवर सामाजिक क्षेत्रात काम करताना सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आणि सहकार्य लाभले. आता पक्षाच्या माध्यमातून जिल्हाभरातील विविध स्वयंसेवी संस्थांना एकत्रित करून अधिक व्यापक स्तरावर समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा मानस आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यावरण आणि युवक सक्षमीकरण या क्षेत्रांना विशेष प्राधान्य दिले जाईल.”तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सामाजिक उपक्रम पोहोचवणे, स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय वाढवणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट राहील.”त्यांच्या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. संतोष जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्य अधिक गतिमान व प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.आयकार्ड फोटो.. संतोष जगताप

Post a Comment

0 Comments