पंचायत समिती सभापती साठी 9 मार्चला निवडणुका सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी 9 मार्चला निवडणुका होणार असल्याचे जिल्ह्यामध्ये राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. जिल्ह्यातील 13 पंचायत समितीच्या दोन्ही 146 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 90 जागा विजय मिळवलेला असून, भाजपचे 28 सदस्य विजयी झाले आहेत ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 12 ,शिवसेनेने 10 ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने चार, तर दोन अपक्ष सदस्य निवडून आलेले आहेत. 13 पैकी आठ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, त्यांच्या पक्षाची सभापती, उपसभापती होणार आहेत, आंबेगाव ,शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर ,वेल्हे, बारामती आणि इंदापूर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे ,त्यामुळे या ठिकाणी सभापती व उपसभापती पदावर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील, मात्र जुन्नर ,खेड, दौंड आणि भोर येथील चित्र रंगतदार होणार आहे, जुन्नर मध्ये शिवसेना आघाडीवर असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत स्थितीमध्ये आहे, तर भोर मध्ये राष्ट्रवादी व भाजपचे समसमान सदस्य असल्याने, तेथे राजकीय समीकरणे निर्णयाक ठरणार आहेत, ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार 20 मार्चपूर्वी पहिली सभा घेणे बंधनकारक आहे, त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी 13 उपजिल्हाधिकाऱ्यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे, प्रशासनाने ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी लक्ष हे कायम! जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे, 17 मार्चला ही निवडणूक होण्याची शक्यता आहे, तर अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे ,त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 73 पैकी 51 गटांमध्ये विजय मिळवलेला आहे ,मात्र पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने, अंतर्गत चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुरंदर तालुक्यातून सभापती पदासाठी अमित झेंडे हे प्रमुख राष्ट्रवादीचे दावेदार आहेत, तर उपसभापती पदासाठी या पुरंदर तालुक्यामधील भाजपची साथ घेणार असल्याचे सूत्राकडून माहिती मिळाली आहे, तर उपसभापती पदासाठी माळशिरस गणातून व भिवडी गणातून उमेदवारी उपसभापती साठी देणे हे औचितत्याचे ठरणार आहे, तर विरोधी बाकावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बेलसर गणातील व वीर गणातील हे विरोधी बाकावर बसण्याची शक्यता दाट आहे,अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments