Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा पाच जणांना चावा; तर लहान मुलांचाही यामध्ये समावेश; मध्यरात्री श्वान जेरबद्ध: या घटनेमुळे सासवड परिसरामध्ये घबराटीचे वातावरण ! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड येथील तारा दत्त पार्क परिसरातील शुक्रवारी दि. 27 रोजी रात्री एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने एका लहान मुलासह चार महिलांना चावा घेऊन जखमी केले, या घटनेमुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या हल्ल्यात तारा दत्त पार्क मधील तीन वर्षाचा आरव राकेश जगताप तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक कमल मारुती जगताप यासह अकॅडमीच्या मिनल शिरसागर ,आर्या शेलार, सिंधी भिंताडे या विद्यार्थ्यांनी जखमी झाल्या आहेत, याबरोबरच शंभूराजे बापू मुळीक या लहान मुलावर या कुत्र्याने झडप घेतली होती, मात्र त्याच्या वडिलांच्या प्रसंगावधानाने शंभूराजे बचावला कुत्र्याने नागरिकावर हल्ले केलेचे समजताच, नगरसेवक प्रदीप राऊत, राजन जगताप तसेच साकेत जगताप आणि पालिकेचे आरोग्य समन्वयक राम कारंडे यांनी तातडीने हालचाली करत, नगरपालिकेच्या शवान पकडणाऱ्या पथकाला पाचरणे केले, स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध मोहीम राबवून रात्री साडेबाराच्या सुमारामध्ये या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात यश आले, आरवचे वडील राकेश जगताप म्हणाले की, श्वानदंशानंतर उपचारासाठी आम्ही सासवड ग्रामीण रुग्णालयात गेलो असता, तेथे श्वान दंशाची लस देण्यात आली, मात्र पिसाळलेले कुत्रे चावल्यावर देण्यात येणारी सिरम लस देण्याची सुविधा नसल्याने, पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले, त्या ठिकाणी सुद्धा पहाटे तीन वाजता सिरम लस मिळाली आता आरव आणि इतरांची प्रकृती स्थिर असून, सकाळीच घरी सोडल्याचे त्यांनी सांगितले असून ,इतर जखमी महिलावरही ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सध्या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नगरसेवक प्रदीप राऊत यांनी दिली असून, पालिकेकडून भटके कुत्री पकडण्याचे काम सध्या सुरू असल्याचेही ते म्हणाले. शंभूराजे बापू मुळीक या लहान मुलावर कुत्र्याने झडप घातली होती परंतु, पत्रकार बापू मुळीक यांच्या प्रसंगावधानामुळे तो मुलगा बचावला असता पत्रकार महोदयांनी त्वरित नगरपालिकेची मुख्याधिकारी त्या ठिकाणी समन्वयक व नगरसेवक यांना फोन करून त्या ठिकाणी त्या घटनेची माहिती देऊन ,त्वरित त्या ठिकाणी स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध मोहीम राबवून रात्री साडेबाराच्या सुमारामध्ये या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात त्या ठिकाणी यश मिळाले. सासवड ग्रामीण रुग्णालयामधील शवानदंष आणि सर्पदंशअंशांच्या लसी मुबलक प्रमाणामध्ये आहेत मात्र; पिसाळलेले कुत्र चावल्यावर शवानदंषाच्या लशी बरोबरच सिरम देणे आवश्यक असते, त्यासाठी अति दक्षता कक्ष सेवा गरजेची आहे, सासवड ग्रामीण रुग्णालयात अति दक्षता कक्ष नाही, सिरम दिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया लगेच लहान मुलावर तर भयानक प्रतिक्रिया येते, लहान मुलांना तर भयानक प्रतिक्रिया येते, त्यामुळे श्वान दंशाची लस देऊन, पुढील उपचारासाठी त्यांना ससून मध्ये जाण्यास सांगितले आहे. डॉक्टर यशवंत पाटील, वैद्यकीय अधिकारी सासवड ग्रामीण रुग्णालय सासवड. ग्रामीण रुग्णालयात शवानदंष आणि सर्पदंष यासारख्या आपत्तीकालीन लशी बरोबरच पिसाळलेल्या कुत्र्यांनी दंश केल्यावर आवश्यक असणारी सिरम व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या रुग्णालयांमध्ये अति दक्षता कक्ष सुविधाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. जेणेकरून रुग्णांना पुण्याला धाव घ्यावी लागणार नाही, यासाठी ग्रामीण रुग्णालयात इथेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. राजन जगताप नगरसेवक सासवड नगरपालिका आरोग्य विभाग.

Post a Comment

0 Comments